शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

दिबांच्या जन्मगाव जासईत पुन्हा सत्ता स्थापनेसाठी इंडिया महाआघाडीचे प्रयत्न; भाजपचे मात्र एकला चलो रे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2023 12:20 IST

भाजपचे निवडणुकीतील भविष्य अवलंबून आहे.

मधुकर ठाकूर, उरण : लोकनेते दिवंगत दिबांचे जन्मगाव असलेल्या आणि वार्षिक पावणे दोन कोटी आर्थिक उत्पन्न असलेल्या जासई ग्रामपंचायतींवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी इंडिया महाआघाडीने कंबर कसली आहे. धनदांडग्यांच्या धनशक्तीच्या आणि स्वबळावर लढणाऱ्या नवख्या भाजपच्या उमेदवारांनी इंडिया महाआघाडीला निवडणुकीत आव्हान दिले आहे.मात्र नवख्या उमेदवारांवर मतदार कितपत विश्वास टाकतात यावरच भाजपचे निवडणुकीतील भविष्य अवलंबून आहे.

लोकनेते दिवंगत दिबांच्या जन्मगावाबरोबर १९८४ साली देशभर गाजलेल्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाचेही जासई प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाते.संघर्षाचा इतिहास असलेल्या जासई ग्रामपंचायतीमध्ये कॉंग्रेसचा एक अपवाद वगळता दिबांच्या पाठीराख्यांनी शेकाप व्यतिरिक्त अन्य कोणत्याही राजकीय पक्षांकडे पंचायतीची सत्ता जाऊ दिलेली नाही.जासई ग्रामपंचायतीची लोकसंख्या १२ हजारांहून अधिक आहे.ग्रामपंचायत हद्दीतील विविध कंटेनर यार्ड, कंपन्यांमुळे ग्रामपंचायतीचे वार्षिक आर्थिक उत्पन्न पावणे दोन कोटीच्या घरात आहे.तसेच विविध आंदोलनांचे केंद्र म्हणूनही जासईची ओळख आहे.त्यामुळे वर्चस्वासाठी ग्रामपंचायतीवर आपल्याच पक्षाचे वर्चस्व असावे ही प्रबळ इच्छा सर्वच राजकीय पक्षात असणे स्वाभाविकच आहे.

मात्र मागील अनेक वर्षांपासून दिबांचे गाव म्हणून नावारूपास आलेल्या जासई ग्रामपंचायतीवर कॉंग्रेसचा एखादा अपवाद वगळता कायम शेकापचेच वर्चस्व राहिले आहे.या निवडणूकीत मात् भाजपने पुन्हा एकदा उडी घेतली आहे.मात्र मागील निवडणुकीपासून सलग सात वर्षे सरपंच व ग्रामपंचायतीचा धुरा सांभाळणाऱ्या आणि सरपंच पदासाठी प्रबळ दावेदार म्हणून ओळखले जाणाऱ्या संतोष घरत हे सेना, शेकाप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी आदी पक्ष्यांच्या महाआघाडीने भाजपला निवडणूकीत चारमुंड्या चीत करण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे.त्यातच नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव देण्यासाठी भाजपप्रणीत केंद्र,राज्य सरकारने चालविलेल्या दिरंगाईमुळे जासईतील मतदारात मोठी नाराजी आहे.

जासई ग्रामपंचायतीमध्ये सहा प्रभाग आहेत.या सहा प्रभागातून थेट सरपंच पदासह १६ सदस्यपदासाठी ५ नोव्हेंबर रोजी निवडणूक होत आहे.थेट सरपंचाच्या एका जागेसाठी तीन उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत.यामुळे सरपंचपदासाठी तिरंगी लढत होत आहे.तर प्रभाग क्रमांक तीनमधुन इंडिया महाआघाडीच्या सृष्टी म्हात्रे यांची याआधीच बिनविरोध निवड झाली आहे.त्यामुळे उर्वरित १६ सदस्यपदासाठी ३४ उमेदवार निवडणूक लढवित असल्याने महाआघाडी विरोधात भाजप अशी सरळ लढत होणार आहे.या मतदार संघात ४१८२ मतदार आहेत.

मागील निवडणुकीत स्थबळावर शेकापने  निवडणूक लढविली होती.थेट सरपंचपदी झालेल्या निवडणुकीत संतोष घरत विजयी झाले होते.तसेच शेकापने सत्ताही काबीज केली होती.या निवडणुकीतही सरपंचपदासाठी इंडिया महाआघाडीचे अनुभवी संतोष घरत यांना उमेदवारी दिली आहे.त्यामुळे भाजपचे नवखे बळीराम घरत यांच्यातच थेट लढत होणार आहे.महाआघाडीचे शिवसेनेचे बबनदादा पाटील, जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहर भोईर, कॉंग्रेस कमिटीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत, तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, शेकापचे ज्येष्ठ आमदार जयंत पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, उद्योजक जे.एम.म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचार सुरू आहे.तर भाजपतर्फे माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रचाराचा धुरा सांभाळली आहे. विकासाच्या बळावर सरपंचपदासह सदस्यपदाच्या १७ जागांवर महाआघाडीचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येतील असा विश्वास महाआघाडीचे संतोष घरत यांनी व्यक्त केला आहे.तर विरोधकांवर टीका करताना जासईचा विकास करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येतील.तसेच सरपंचासह किमान १० सदस्य विजयी होऊन ग्रामपंचायतीवर सत्ता स्थापन करु असा दावा भाजपचे सरपंचपदाचे उमेदवार बळीराम घरत यांनी केला आहे.

टॅग्स :uran-acउरण