शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

भारत व्यवस्थेमुळेच जगात टिकू शकला

By admin | Updated: January 10, 2017 05:58 IST

माणूस हा सातत्याने व्यवस्थेला प्रतिसाद देणारा आहे. जगाच्या पाठीवर भारत हा एकमेव देश आहे की, जो केवळ कायद्यामुळे नव्हे

अलिबाग : माणूस हा सातत्याने व्यवस्थेला प्रतिसाद देणारा आहे. जगाच्या पाठीवर भारत हा एकमेव देश आहे की, जो केवळ कायद्यामुळे नव्हे, तर व्यवस्थेमुळे टिकू शकला आहे. जागतिक अर्थकारणात देशाच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता, ती बदलण्याकरिता काळ््या पैशाला लगाम आणि भ्रष्टाचार मुक्तता याकरिता नवीन आर्थिक व्यवस्था अत्यावश्यक असल्याचे विचारात घेऊन अर्थक्रांती मोड्यूल दिले आहे. आपल्या देशातील सर्व क्षमतांचा वापर पूर्णपणाने केला, तर साऱ्या जगाला भारत जेऊ घालू शकतो, असा विश्वास अर्थक्रांतीकार अनिल बोकील यांनी व्यक्त केला आहे.रायगड मेडिकल असोसिएशन आणि आरसीएफ रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने सरखेल कान्होजी आंग्रे वसाहतीमधील आरसीएफ सभागृहात आयोजित दोन दिवसांच्या ‘रायकॉन-२०१७’या डॉक्टरांच्या अभ्यासकार्यशाळेत बोकील यांनी ‘अर्थक्रांती’ या विषयावर आपल्या संगणकीय प्रस्तुतीकरणासह व्याख्यान दिले. बोकील आपल्या अर्थनीती संशोधनात्मक व्याख्यानात म्हणाले की, स्रोत (सोर्स)आणि संसाधन (रिसोर्स) यांच्यामधील निखळलेल्या दुव्यामुळेआर्थिक समस्यांना केवळ भारतालाच नव्हे, तर साऱ्या जगाला सामोरे जावे लागत आहे. पृथ्वीवरील लोकसंख्या इ.स.१००० मध्ये २० कोटी ८० लाख झाली. इ.स.१८०६ मध्ये लोकसंख्येत पहिली मोठी वाढ दिसून आली आणि लोकसंख्या १०० कोटी झाली. पुढील १२० वर्षांच्या दुसऱ्या टप्प्यात इ.स. १९२६ मध्ये ही लोकसंख्या दुप्पट होऊन २०० कोटी झाली आणि सद्यस्थितीत पृथ्वीची लोकसंख्या तब्बल ७५० कोटी झाली आहे. परिणामी, या लोकसंख्येकरिता उपलब्ध नैसर्गिक स्रोत पुरे पडू शकत नाहीत.परिणामी, संसाधनांचा ताळमेळ राहात नाही. त्यातून आर्थिक ताणाची निर्मिती होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मानवी आयुष्यात पैशाला अनन्य साधारण महत्त्व आहे. ‘धन’ आणि ‘द्रव्य’ यांचा ताळमेळ नसल्याने आर्थिक प्रश्न निर्माण झाले आहेत. देशात उपलब्ध सोन्याचा पैशांबरोबर (करन्सी) असलेल्या संपूर्ण भारतात १९५६मध्ये, तर उर्वरित जगात १९७१मध्ये संपुष्टात आला आहे. पैसा म्हणजे नोटा हे विनिमयाचे माध्यम आहे, त्या व्यवहारातच राहिल्यातर त्याची उपयुक्तता देशास असते; परंतु त्या जमा करून संचय केला, तर त्यांचा व्यवहारास उपयोग नाही आणि म्हणूनच त्यांचा नोट संचय करता येणार नाही, अशी अर्थनीती गरजेची आहे. त्याकरिता अर्थक्रांती असल्याचे सांगितले.सरकारकडे जमा होणारा कराचा पैसा योजनांच्या माध्यमांतून थेट लाभार्थीच्या खात्यात येईल, असे पर्याय सुचविण्यात आले असल्याचे बोकील यांनी सांगितले.यावेळी रायगड मेडिकल असोसिएशच्या या ‘रायकॉन-२०१७’चे प्रमुख बालरोगतज्ज्ञ डॉ. विनायक पाटील, असोसिएशनचे पदाधिकारी स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ डॉ. चंद्रकांत वाजे, डॉ. निशिगंध आठवले, ‘चला मुलांना घडवू या’ या बालकपालक प्रबोधन उपक्रमाचे प्रणेते डॉ. चंद्रशेखर दाभाडकर, डॉ. राजीव धामणकर यांच्यासह जिल्ह्यातील सुमारे ८०० डॉक्टर्स आवर्जून उपस्थित होते.