शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा माथेरानमधील पर्यटनावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 00:45 IST

पर्यटकांची संख्या रोडावली : व्यावसायिकांवर मोठा परिणाम

माथेरान : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशातील निर्बंध अधिक कडक केले आहेत. त्याचा फटका पर्यटन व्यवसायाला बसताना दिसतोय. गेल्या दोन आठवड्यांत सलग सुट्ट्या असूनदेखील बहुतेक पर्यटन क्षेत्रांमध्ये शुकशुकाट दिसून येत आहे. माथेरान ही त्याला अपवाद नाही. कोरोनामुळे येथे येणा-या पर्यटकांची संख्या रोडवल्याने व्यावसायिक चिंतित आहेत.माथेरानकरांसाठी मागील वर्ष खूप वाईट गेले. पहिले निसर्ग चक्रीवादळाने संपूर्ण गावाची दाणादाण उडवली होती त्यातून सावरत नाही तोच कोरोनाचा कहर झेलावा लागला होता जो अजून ही सुरूच आहे. गेल्या वर्षी पर्यटन हंगामाची वाट पाहणाऱ्या येथील व्यावसायिकांना लॉकडाऊनला सामोरे जावे लागले. लॉकडाऊनने माथेरानकरांना फार मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला ज्यातून अनेक जण अजून ही सावरलेले नाहीत. संपूर्ण आर्थिक व्यवहारच बंद झाल्याने अनेकांना मोलमजुरी करून घर चालवावे लागले होते. या काळातील व्यावसायिकांची वीज व पाणी बिले थकली होती जी अजून ही भरण्याची आर्थिक परिस्थिती येथील स्थानिकांची झालेली नाही. गेले काही दिवस येथील पर्यटन सुरू झाले होते. त्यामुळे येथील स्थानिकांना थोडासा दिलासा मिळाला होता, पण गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढल्याने सलग लागून आलेल्या होळी व गुड फ्रायडेच्या सुट्ट्यांना लाभलेला अल्प प्रतिसाद पाहून व्यावसायिकांची चिंता वाढू लागली आहे. त्यातच लॉकडाऊनबाबत सुरू असलेल्या उलटसुलट चर्चा मुळे येथील बहुतेक आगाऊ बुकिंग रद्द होऊ लागले आहे. अशा या स्थितीत सर्वसामान्यांचा विचार न करता फक्त मार्चअखेरीचे आपले टार्गेट पूर्ण करण्यासाठी वीज व पाणी प्रशासन येथील व्यावसायिकांच्या मागे हात धुऊन लागले आहे. अनेकांच्या जोडण्या खंडित ही करण्यात आलेल्या आहेत. पर्यटकांमध्ये होत असलेली घट व घरची बेताची आर्थिक परिस्थिती यामध्ये येथील व्यावसायिक भरडला जात आहे.  माथेरानमधील सर्व आर्थिक व्यवहार हे पर्यटनावर अवलंबून आहेत आणि पर्यटकच यायचे बंद झाले तर त्याचा थेट फटका येथील हातरिक्षा, अश्वचालक, हॉटेल व स्थानिक व्यावसायिकांना बसत असतो. त्यामुळेच येथील व्यावसायिक लॉकडाऊनच्या विरोधात आहेत.  पुन्हा लॉक डाऊन झाल्यास येथील पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प होऊन अनेकजण बेरोजगारीच्या खाईत नकळत लोटले जातील. तसेच मिनीट्रेनही पर्यटकांअभावी रिकाम्याच धावताना दिसतात.