शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

मुरुड, काशीद समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांच्या दुर्घटनांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 05:20 IST

मुरुड तालुक्यास दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. येथील विस्तीर्ण समुद्रकिनारा, नारळ-पोफळीच्या बागा, सुरुची वने, ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर वर्षभर पर्यटकांची वर्दळ असते.

- संजय करडेमुरुड जंजिरा : मुरुड तालुक्यास दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. येथील विस्तीर्ण समुद्रकिनारा, नारळ-पोफळीच्या बागा, सुरुची वने, ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर वर्षभर पर्यटकांची वर्दळ असते. मात्र उत्साहाच्या भरात सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने गेल्या काही वर्षात येथील समुद्रकिनाºयावर बुडून मृत्यू होण्याच्या घटनाही वाढल्या आहेत.भरती-ओहोटीचे गणित लक्षात न घेतल्यास पर्यटक समुद्रात उतरतात. याठिकाणी लावलेल्या सूचनांकडेही अनेकदा दुर्लक्ष केले जाते. मुरुड समुद्रकिनारी जून महिन्यात तीन जणांचा बुडून मृत्यू झाला. पनवेल तालुक्यातील नावडे येथे राहणारे अभिषेक म्हात्रे (३२) व त्यांच्या समवेत आलेली पूजा अशोक शेट्टी (२८) हे काशीद समुद्रकिनारी पोहण्यासाठी उतरले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. त्यानंतर अवघ्या चार दिवसांनी उरण तालुक्यातील उलवे येथील महंमद गनी (२५ ) हा तरुण बुडाल्याची घटना घडली.काशीद समुद्रकिनारी पर्यटकांसाठी सूचना फलक लावण्यात आले आहे. पोलीस तसेच स्थानिकांकडूनही पर्यटकांना वारंवार सूचित केले जाते. मात्र उत्साहाच्या भरात ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नसतात. वीकेण्ड, सुटीच्या दिवशी मुंबई, ठाणे, पुणे येथून हजारो पर्यटक समुद्रकिनारी फिरण्यासाठी येतात. मात्र उधाणामुळे प्रवाहाचा अंदाज येत नाही आणि बाहेरून येणाºया व्यक्तींना भरती-ओहोटीच्या वेळांचीही माहिती नसल्याने नाहक जीव गमवावा लागतो.मुरुड बीचवर १९९१ मध्ये महेंद्र अँड महेंद्र कंपनीच्या ७ कामगारांचा बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर ६ जुलै २०१४ रोजी चेंबूर येथील ६ व्यावसायिकांना पोहताना जलसमाधी मिळाली . फेब्रुवारी २०१६ मध्ये सहलीसाठी आलेल्या पुण्यातील आबिदा इनामदार कॉलेजच्या१४ विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला होता. या दुर्घटनेनंतर शालेय सहलींवर एकप्रकार निर्बंध घालण्यात आले होते.काशीद ग्रामपंचायतीतर्फे बीचवर ठळकपणे खोल समुद्रात पोहणे धोकादायक असल्याचे सूचना फलक लावण्यात आले असले तरी पोलिसांना गुंगारा देऊन पर्यटक खोल समुद्रात जात असल्याने बुडणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.- समुद्रकिनारी शनिवार व रविवारी पोलीस बंदोबस्त त्याचप्रमाणे मेरीटाइम बोर्डाकडून सुरक्षा कर्मचारी नेमणे आवश्यक आहे. पावसाळ्यात जलवाहतूक बंद असते, त्याचप्रमाणे पर्यटकांना पोहण्यासही बंदी घालावी अशी मागणी होत आहे. याबाबत मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्याशी संपर्क साधला असता, अनेकदा पर्यटक मद्यपान करून समुद्रात उतरतात. अनेकांना पोहताही येत नसते. उत्साहाच्या भरात ते प्रवाहाबरोबर वाहत जात असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Raigadरायगड