शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात चोरीच्या घटनांत वाढ

By admin | Updated: September 23, 2015 04:13 IST

जिल्ह्यात दरोडे आणि घरफोडीचे सत्र सुरुच असून सोमवारी पहाटे अलिबाग शहरातील दोन पतसंस्थांचे शटर चोरट्यांनी तोडल्याची घटना घडली

अलिबाग : जिल्ह्यात दरोडे आणि घरफोडीचे सत्र सुरुच असून सोमवारी पहाटे अलिबाग शहरातील दोन पतसंस्थांचे शटर चोरट्यांनी तोडल्याची घटना घडली. पतसंस्थेतील सायरन वाजल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला. त्यामुळे त्यांच्या हाती काहीच लागले नाही. एक चोरटा मात्र सीसीटीव्ही कॅमेरॅमध्ये कैद झाला आहे. या दोन्ही घटनांची नोंद अलिबाग पोलीस ठाण्यात झाली आहे. सातत्याने घडणाऱ्या घटनांनमुळे रायगड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.पाच दिवसांच्या गणरायाला निरोप दिल्यानंतर सर्वच निवांत झोपले असावेत असे समजून चोरट्यांनी थेट पोलीस अधिक्षकांचे मुख्यालय असलेल्या अलिबाग शहरात डाका टाकण्याचा प्रयत्न केला. सोमवारी पहाटे दिड ते अडीच वाजण्याच्या सुमारास ब्राम्हळ आळीतील गृहलक्ष्मी सहकारी पत संस्थेचे शटर तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. तेथील कपाटही त्यांनी फोडले मात्र त्यामध्ये काही स्टेशनरी आणि फाईल होत्या. त्यामुळे त्यांच्या हाताला काहीच लागले नाही. त्याच सुमारास त्याच विभागात असणाऱ्या सावता माळी सहकारी पत संस्थेच्या तीन शटर पैकी डाव्या बाजुच्या शटरचे दोन्ही लॉक चोरट्यांनी तोडले. आतील दरवाजा उघडून चोरट्याने आत प्रवेश केल्यावर तातडीने तेथील सायरन कार्यान्वीत झाला. सायरन वाजताच चोरटे हडबडले. त्यांनी तेथून लागलीच पळ काढला. सायरनचा आवाज सुरुच होता. त्यावेळी पेट्रोलिंगला असलेल्या पोलिसांनी आवाज कसला येतो याची शहानिशा केली असता. त्यांना शटरचे लॉक तोडल्याचे आढळले त्यांनी तातडीने पतसंस्थेच्या अध्यक्षांना फोन करुन माहिती दिली.जिल्ह्यात दरोडेखोर, चोरट्यांची दहशत वाढत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. रायगड पोलिसांकडून कारवाई शुन्य असल्यानेच दरोडेखोर चोरट्यांचे मनसुबे बळावले असल्याचे सातत्याने घडणाऱ्या घटनांनी उघड होते. रायगड पोलिसांनी तातडीने गुन्हेगारांना जेरबंद करुन नागरिकांमध्ये विश्र्वासाचे वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. रायगड पोलिस हे आव्हान केसे पेलतात याकडेचे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)4,710 रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना पाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. आक्सा इंडीयन प्रा.लि.या कंपनीच्या मोकळ््या आवारातील २० हजार रुपयांचे लोखंडी पाईप चोरट्यांनी शनिवारी चोरुन नेले आहेत. या चोरी प्रकरणी पाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करित आहेत.गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या व परतणाऱ्या गणेशभक्तांच्या सुकर प्रवासाकरीता गोवा महामार्गावर व्यस्त तर गावागावांत गणेशोत्सव बंदोबस्तात पोलीस व्यस्त या परिस्थितीचा फायदा घेत जिल्ह्यात चोरट्यांनी घरफोड्या केल्याचे उघडकीस आले आहे. अलिबाग शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी घरफोड्या झाल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशा प्रकारच्या चोरीच्या घटनांमध्ये दिवसें दिवस वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.खोपीली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचवली शेकीन येथील घरातून २९ हजार ३०० रु. दागिने व रोकड शनिवारी चोरट्यांनी लंपास केली. माणगांवमध्ये मध्यरात्री घराचे ग्रील तोडून चोरट्यांनी ६ हजाराचा ऐवज चोरला.माणगांव जवळच्या रवाळजे गावच्या जंगलात चरण्यासाठी सोडण्यात आलेले एक बैल, एक गाय आणि एक वासरु अशी तीन जनावरे चोरुन नेल्या प्रकरणी माणगांव पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.शनिवारी रात्री पेण तालुक्यांतील आमटेम गावांत आई व मुलगी घरात एकटेच असताना, एकाने घरात घुसुन मुलीचा विनयभंग केला. या प्रकरणी वडखळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.