शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार योजनेमुळे साठ्यात वाढ

By admin | Updated: September 28, 2016 02:47 IST

गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे जिल्ह्यात मोठे नुकसान झाले असले तरी महाड व पोलादपूर तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेसाठी हा पाऊस वरदान

- जयंत धुळप,  अलिबागगेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे जिल्ह्यात मोठे नुकसान झाले असले तरी महाड व पोलादपूर तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेसाठी हा पाऊस वरदान ठरला आहे. १२ गावांतील १४५ विविध कामांच्या माध्यमातून तब्बल २८३ टीसीएम (हजार घनमीटर) अतिरिक्त जलसाठ्याची निर्मिती झाली आहे. महाड तालुक्यातील पांगारी, विन्हेरे, नातोंडी, करंजाडी, चांढवे खुर्द, मुमुर्शी, कोळोसे व वरंध तर पोलादपूर तालुक्यातील सडवली, कोतवाल,खुर्द फणसकोंड, रानवडी बुद्रुक अशी बारा गावे जलसमृध्द झाली आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात जलदुर्भिक्षावर मात करता येणार आहे. महाड, पोलादपूर या दोन तालुक्यात गेल्या दोन वर्षात जलयुक्त शिवार या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत एकूण १४५ कामे पूर्ण झाली आहेत. यात महाड तालुक्यातील पांगारी, विन्हेरे, नातोंडी, करंजाडी, चांढवे खुर्द, मुमुर्शी, कोळोसे व वरंध या आठ गावांसाठी ही योजना राबविण्यात आली. या गावांमध्ये सलग समतर चर-४३, अनघड दगडी बांध-९, वळण बंधारे-२, जुनी भातशेती दुरुस्ती-९,सिमेंट नाला बांध-८ अशी एकूण ७९ कामे करण्यात आली. त्यामुळे या गावांच्या क्षेत्रात २११ टीसीएम अतिरिक्त पाणीसाठा निर्माण झाला आहे. महाड तालुक्यातील पूर्ण झालेल्या कामांसाठी १ कोटी ४७ लाख ७० हजारांचा निधी लागला आहे.पोलादपूर तालुक्यातील सडवली, कोतवाल, खुर्द फणसकोंड, रानवडी बुद्रुक या चार गावांसाठी योजनेंतर्गत सलग समतर चर निर्मिती आणि जुनी भातशेती दुरु स्तीची ७९कामे करण्यात आली. या कामामुळे ७२ टीसीएमअतिरिक्त पाणीसाठा निर्माण झाला. महाड व पोलादपूर या दोन्ही तालुक्यात मिळून सलग समतर चर एकूण ६९ खोदण्यात आले. पोलादपूर तालुक्यात ३५ लाख ६५ हजारांचा निधी लागला आहे. दोन्ही तालुक्यांतील १२ गावांच्या क्षेत्रात पाणी मुरण्याची प्रक्रि या प्रभावी पद्धतीने झाली. विहिरींच्या जलपातळीत लक्षणीय वाढ झाल्याने भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही तसेच,रब्बी पिकांनाही त्याचा लाभ होईल, असे निरीक्षण कृषी विभागाचे आहे.सहा गावांचा समावेशचालू आर्थिक वर्षात महाड तालुक्यातील कुंभेशिवथर, रेवतळे व मांडले-पारवाडी अशा तीन तर पोलादपूर तालुक्यातून मोरसंडे, केवनाळे, पळचिल अशा तीन या गावांची निवड जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आली आहे. कामाची प्रगती वेबसाईटवरजलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कोणतेही काम सुरू करण्यापूर्वीची परिस्थिती, काम सुरूअसताना,आणि कामाच्या पूर्ततेनंतरच्या परिस्थितीची सर्व छायाचित्रे अक्षांश-रेखांशासह वेबसाईटवर अपलोड करण्यात आली आहेत.