शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
2
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
3
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
4
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
5
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
6
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
7
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
8
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
9
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
10
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
11
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
12
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
13
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
14
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
15
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
16
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
17
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

बोगस मजूर संस्थांच्या अडचणीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 23:29 IST

सहकार आयुक्तांनी मागवला अहवाल : बोगस मजूर संस्थांचे दणाणले धाबे

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील काही मजूर सहकारी संस्थांच्या संशयास्पद कामकाजामुळे राज्याच्या सहकार आयुक्तांनी चौकशीला सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील सर्व सहायक निबंधक, सहकारी अधिकारी यांच्याकडून संबंधित मजूर सहकारी संस्थांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांना दिले आहेत. यातील विशेष बाब म्हणजे मजूर सहकारी संस्थाच्या चौकशीचा अहवाल येईपर्यंत जिल्हास्तरीय समितीमार्फत करण्यात येणारे काम वाटप थांबवण्यात आल्याने बोगस मजूर संस्थांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

जिल्ह्यामध्ये बोगस मजूर सहकारी संस्था स्थापन करून त्याचे लोणी खाण्याचे प्रमाण चांगलेच फोफावले आहे. त्याला तातडीने चाप लावून बोगस मजूर सहकारी संस्थांवर कडक कारवाई करावी, अशी तक्रार माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी केली होती. त्याची दखल घेत सहकार आयुक्तांनी जिल्हा उपनिबंधकांकडे कारवाईचा अहवाल मागितला आहे, त्यामुळे गेले काही महिने या प्रकरणात हात झटकणारे जिल्हा उपनिबंधकही चांगलेच अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मजूर सहकारी संस्थांच्या कारभाराची अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चांगलीच माहिती असते. मात्र, राजकीय दबावाला बळी पडून चुकीच्या कामांना त्यांच्याकडून समर्थन दिले जाते, असे माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आयुक्तांच्या आदेशामुळे त्यांना कारवाई करावीच लागणार असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्था मजुरांची मजुरी सभासदांच्या बँक खात्यावर जमा करीत आहेत की नाहीत? मजूर सभासदांची बँकेत खाती उघडलेली आहेत की नाहीत? अशा प्रमुख बाबी या पडताळणीमध्ये तपासायच्या आहेत. जिल्हा उपनिबंधक यांनी या बाबत खातरजमा करण्याकरिता मजूर सहकारी संस्थांची तपासणी करून संबंधित निबंधकाच्या पात्रता प्रमाणपत्रासह अहवाल सादर करण्याबाबत रायगड जिल्ह्यातील सर्व सहायक निबंधक, सहकारी अधिकारी (वर्ग-१) यांना कळवावे. त्यांचा अहवाल येईपर्यंत जिल्हास्तरीय समितीमार्फत करण्यात येत असलेले कामवाटप थांबविण्यात आल्याचे जिल्हा उपनिबंधक पांडुरंग खोडका यांनी सांगितले.

आयुक्तांच्या बडग्यामुळे जिल्हा उपनिबंधक, तसेच सहायक निबंधक, सहकारी अधिकारी कामाला लागल्याचे चित्र आहे. त्याचप्रमाणे बोगस मजूर नोंदणी केलेल्या मजूर संस्थांची चांगलीच पाचावर धारण बसली आहे.संस्थांचे कामवाटप स्थगित कराच्आयुक्तांनी चौकशी लावल्यामुळे रायगड जिल्हा परिषदेच्या कामकाज वाटप समितीचे प्रमुख अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मजूर सहकारी संस्थांचे कामवाटप स्थगित करावे, अशी पुन्हा मागणी माजी आमदार ठाकूर यांनी केली आहे. मजूर सहकारी संस्थेतील सभासदांच्या नावावर ५ ते २५ एकर जमीन कशी आहे? काही मजुरांची टोलेजंग हॉटेल्स कशी आहेत? सरकारी निवृत्ती वेतनधारक मजूर कसे? काही मजूर थेट परदेशात भ्रमण कसे करतात? असे प्रश्न उपस्थित करून ठाकूर यांनी मजूर सहकारी संस्थांमधील बोगसपणा उघड केला होता. आता सहकार आयुक्तांकडून या बाबत दखल घेऊन चौकशी सुरू झाल्याने बोगस मजूर सहकारी संस्थांचा खरा कारभार चव्हाट्यावर येणार असल्याचे दिसून येते.