शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
4
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
5
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
6
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
7
उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
8
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
9
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
10
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
11
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
12
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार
13
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
14
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
15
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
16
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
17
रात्री खोकल्याचं औषध प्यायला, पण सकाळी उठलाच नाही; ५ वर्षाच्या मुलाच्या मृत्युनं खळबळ!
18
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
19
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
20
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...

जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांची गैरसोय, किनारे गजबजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 01:01 IST

Janjira fort : दिघी व राजपुरी येथून जंजिरा किल्ल्यावर सुट्यांच्या दिवशी शेकडो पर्यटक जात असतात. त्यात वृद्ध, महिला व बालकांचादेखील समावेश असतो.

- गणेश प्रभाळे

दिघी : नववर्षाच्या स्वागताला पर्यटकांची रेलचेल आतापासूनच सुरू झाली आहे. श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर, हरिहरेश्वरसोबत पाण्यातील किल्ला जंजिरा पाहण्याचा बेत करत अनेक पर्यटकांची या आठवड्यापासूनच गर्दी दिसून आली. बऱ्याच कालावधीनंतर येथील समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजू लागले आहेत. येथील जंजिरा किल्ल्यावरदेखील पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र, किल्ल्यात जाण्यासाठी शिडांच्या बोटीतून उतरताना पर्यटकांची गैरसोय होत असून जीवाशी खेळ सुरू आहे.दिघी व राजपुरी येथून जंजिरा किल्ल्यावर सुट्यांच्या दिवशी शेकडो पर्यटक जात असतात. त्यात वृद्ध, महिला व बालकांचादेखील समावेश असतो. राजपुरी किंवा दिघी येथून पर्यटकांना मेकॅनिक बोटीमधून बसून किल्ल्यानजीक आणले जाते व किल्ल्यानजीक शिडांच्या वेगळ्या होडींमधून किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ नेले जाते. जंजिरा किल्ल्यात प्रवेश करताना प्रवेशद्वाराजवळ पायऱ्या आहेत. या पायऱ्यांलगतच शिडांच्या होडीतून उतरून किल्ल्यात प्रवेश करावा लागतो. मात्र, किल्ल्यालगत कोणताही धक्का नसल्याने वृद्ध, महिला व बालकांना उतरण्यास त्रास होतो. बोटींवर असलेले स्थानिक तरुण हात देऊन पर्यटकांना बोटींतून उतरण्यास व चढण्यास मदत करतात. मात्र, लाटांचा मारा असल्याने मानवी आधारदेखील कुचकामी ठरतो. बऱ्याच वेळा बोटीतून चढताना अथवा उतरताना पर्यटक पडल्याच्या घटना घडल्या आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या पर्यटकांना समुद्राचे मोठे अप्रूप असते. अशातच समुद्राच्या अजस्र लाटा पाहून त्यांचे मन थबकते. अचानक समुद्रात पडण्याची भीती त्यांच्या मनावर आघात करण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

पर्यटकांना पाणी व शौचालय सुविधा हवीकिल्ला बघण्यासाठी पुरातत्त्व विभागाकडून प्रत्येकी २५ रु. आकारले जातात.  मात्र, किल्ल्यात पाणी व अद्ययावत स्वच्छतागृहाची सुविधा नाही. त्याचबरोबर पर्यटकास किल्ल्यासंबंधित हवी असलेली माहिती प्रशिक्षित गाइडकडून मिळावी, अशी मागणी पर्यटकांकडून होत आहे.

जंजिरा किल्ल्याच्या दरवाजापासून ५० मीटरचा जरी धक्का बांधण्यात आला तरी पर्यटकांना चढताना वा उतरताना सोयीचे असेल. यासाठी मालवण किल्ल्याच्या धर्तीवर जेट्टी तयार करण्याबाबत २०१७ साली संघटनेतर्फे पत्र देऊन पाठपुरावा करण्यात आला. मात्र, अद्याप काम झाले नाही .         - श्रीकांत सुर्वे, अध्यक्ष, प्रवासी संघटना 

 किल्ल्याजवळ बांधण्यात येणाऱ्या जेट्टीसाठी पुरातत्त्व विभागाकडे कागदोपत्री पूर्तता करण्यात आली. मात्र, किल्ल्याजवळ जेट्टी बांधण्यास संबंधित विभागाने काही तांत्रिक कारणास्तव प्रस्ताव थांबवल्याने तीन वर्षांचा कालावधी उलटून गेला.  - सुधीर देवरे, कार्यकारी अभियंता, मेरीटाइम बोर्ड

टॅग्स :FortगडRaigadरायगड