शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

अस्थायी वैद्यकीय अधिकाºयांचे समावेशन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 02:51 IST

राज्यातील ग्रामीण, आदिवासी, दुर्गम भागात प्रतिकूल परिस्थितीत अस्थायी बी.ए.एम.एस. वैद्यकीय अधिकारी अविरत सेवा देत आहेत.

म्हसळा : राज्यातील ग्रामीण, आदिवासी, दुर्गम भागात प्रतिकूल परिस्थितीत अस्थायी बी.ए.एम.एस. वैद्यकीय अधिकारी अविरत सेवा देत आहेत. या अस्थायी वैद्यकीय अधिकाºयांचे सेवा समावेशन करावे व स्थायी बी.ए.एम.एस. वैद्यकीय अधिकाºयांचे जिल्हा तांत्रिक संवर्ग गट ‘ब’ यांना गट ‘अ’ परिपत्रक निर्गमित करणे या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य मॅग्मो आयुर्वेद संघटनेकडून मुंबईतील आझाद मैदान येथे मंगळवारपासून साखळी उपोषण करण्यात येणार आहे.महाराष्ट्र राज्यातील आरोग्य सेवेमध्ये आज शासकीय पातळीवर वेतनवाढ, पदव्युत्तर शिक्षण, सीईटी परीक्षेत गुण वाढविणे, सरळ स्थायी नियुक्ती, जिल्हा पातळीवर नियुक्ती आदी विविध प्रकारचे प्रयत्न करून देखील एम.बी.बी.एस. अर्हताधारक शासकीय सेवेत येण्यासाठी तयार नाहीत. त्यामुळे आजपर्यंत वैद्यकीय अधिकारी म्हणून कित्येक पदे रिक्त आहेत. ग्रामीण, आदिवासी, दुर्गम, डोंगराळ भागात अतिशय प्रतिकूल परिस्थितीत एकूण ७८९ बी.ए.एम.एस. वैद्यकीय अधिकारी गेल्या १०-१२ वर्षांपासून अस्थायी स्वरूपात काम करीत आहेत. तरीसुद्धा शासन स्तरावरून या वैद्यकीय अधिकाºयांना कोणतेही लाभ मिळत नाहीत. शासकीय सेवेत कार्यरत असताना १२ बी.ए.एम.एस. वैद्यकीय अधिकाºयांचा मृत्यू झाला आहे. परंतु शासनाकडून त्यांच्या कुटुंबीयांना काहीही मदत मिळालेली नाही. त्वरित या अस्थायी बी.ए.एम.एस. वैद्यकीय अधिकाºयांचे सेवा समावेशन व्हावे या मागणीसोबतच जे बी.ए.एम.एस. वैद्यकीय अधिकारी(जिल्हा तांत्रिक संवर्ग व राज्य संवर्ग ) गट-ब सेवेत स्थायी आहेत यांना देखील कित्येक वेळा आश्वासन देऊन देखील गट-ब मधून गट-अ करणेबाबत परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले नाही. हे परिपत्रक तत्काळ निर्गमित करावे या दोन प्रमुख मागण्यांसाठी २९ जुलै रोजी महाराष्ट्र राज्य मॅग्मो आयुर्वेद संघटनेकडून महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाºयांना याबाबतचे निवेदन महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी देण्यात आलेले आहे. जर या मागण्यांचा विचार महाराष्ट्र शासनाकडून झाला नाही तर १ ते १० आॅगस्ट या कालावधीत आझाद मैदानावर महाराष्ट्र राज्य मॅग्मो आयुर्वेद संघटनेकडून लक्षवेधी साखळी उपोषण करण्यात येईल असे या निवेदनात नमूद केले होते.