शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोनाकाळात घटले डेंग्यू तापाचे प्रमाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 02:26 IST

उपाययोजनेसाठी ग्रामपंचायतस्तरावर आरोग्यविषयक पथक तयार

- निखिल म्हात्रेअलिबाग : कोरोनाकाळात इतर आजारांचा फैलाव होऊ नये, म्हणून जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. तसेच या कालावधीत डेंग्यूला आळा घालण्यासाठी ग्रामपंचायतस्तरावर आरोग्यविषय़क एक पथक तयार करून उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असला, तरी डेंग्यू तापाचे प्रमाण घटले आहे.रायगड जिल्ह्यात जून ते फेब्रुवारी या नऊ महिन्यांच्या कालावधीत फक्त १० डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. सध्या जिल्हा रुग्णालयात डेंग्यूचे दोन रुग्ण उपचार घेत आहे, तर उर्वरित पाच जण डेंग्यूसदृश म्हणून उपचार घेत आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे जिल्ह्यातील डेंग्यूचे प्रमाण रोखण्यात यश आले आहे. कोरोना कालावधीत न भासलेली पाणीटंचाई आणि कामानिमित्त होणारे स्थलांतर थांबल्यामुळे डेंग्यू आटोक्यात आल्याचीही यामागची मुख्य कारणे आहेत.पावसाळ्यात डासांची उत्पत्ती वाढत असल्याने डेंग्यूसारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढत असतो. त्यामुळे डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातात. पण, जिल्ह्यातील अनेक भागांत उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवत असते. त्यामुळे पावसाचे पाणी टंचाईग्रस्त भागांमध्ये घराघरांत साठवून ठेवले जाते. मात्र, या पाण्याची साठवण करताना पुरेशी खबरदारी घेतली जात नाही. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढते. डेंग्यूचा प्रादुर्भाव होतो. मात्र, यावर्षी डेंग्यू आटोक्यात आणण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. ज्या ठिकाणी बांधकामे मोठ्या प्रमाणात होत आहेत, त्या ठिकाणी पाण्याची साठवण केली जात असते. या पाण्यात डासांची उत्पत्ती होते.  हिवताप आणि डेंग्यूसारखे आजार बळावतात. डेंग्यूविषयी शहरभर सर्वेक्षण; नागरिकांनी या उपाययोजना कराव्यातनागरिकांनी यावर उपाययोजना म्हणून पाणी १५ मिनिटे उकळून व गाळून प्यावे. स्वतःसह परिसराची स्वच्छता राखावी. ताजे आणि गरम अन्‍नच खावे. दिवसातून किमान पाच लीटर पाणी प्यावे. सार्वजनिक ठिकाणी रूमाल, मास्क वापरावा. सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या, घरातील भांडी स्वच्छ ठेवावी. डासांपासून स्वसंरक्षण करावे. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, अशा उपाययोजना केल्या तर साथीचे आजार दूर राहू शकतात. कामानिमित्ताने जिल्ह्यात स्थलांतरित होणाऱ्या मजुरांचे प्रमाण मोठे आहे. कामानिमित्ताने सातत्याने स्थलांतरित होणाऱ्या मजुरांमध्ये या रोगांचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण अधिक आहे.गेल्या काही दिवसांपासून वातावरणात अचानक सकाळी वाढणारे तापमान तर काही वेळानंतर पडलेल्या थंडीमुळे वातावरणात अचानक बदल झाला आहे. सततच्या बदलणा-या वातावरणामुळे नागरिकांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी कावीळ, अतिसार व घशाच्या आजाराने त्रस्त असलेले २५ ते ३० रुग्ण रोज दवाखान्यात उपचारासाठी येत आहेत. जिल्हा रुग्णालयात सध्या डेंग्यूच्या एका रुग्णावर उपचार सुरू आहेत.-डॉ. राजीव तंबाळे, वैद्यकीय अधिकारी (सामान्य रुग्णालय)डेंग्यूची लक्षणेअचानक तीव्र ताप येणेतीव्र डोकेदुखी, स्नायूदुखी व सांधेदुखीअशक्तपणा, भूक मंदावणे, जास्त तहान लागणे व तोंडाला कोरड पडणेउलट्या होणे, दुसऱ्या दिवसापासून तीव्र डोकेदुखी सुरू होणेअंगावर पुरळ येणे, लाल चट्टे उठू लागतात

टॅग्स :dengueडेंग्यू