शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

अलिबागमध्ये तृणधान्यांतून सकस आहार घेण्याचे विद्यार्थ्यांना धडे

By निखिल म्हात्रे | Updated: August 31, 2023 18:09 IST

कृषी विभागाचा हा अभिनव उपक्रम बालकांपासून युवकांना सकस आहार घेण्याकडे प्रवृत्त करणारा ठरत आहे.

अलिबाग : सोशल मीडिया, फास्टफूडच्या युगात विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकाऐवजी मोबाइल आणि भोजनात सकस आहाराऐवजी बर्गर, पिझ्झाचा समावेश होत आहे. यामुळे बालकांपासून युवा वर्गात विविध आजारांची लागण झाली आहे. विद्यार्थ्यांना बालपणापासूनच आहारात पौष्टिक तृणधान्ये मिळाली आणि तेच खाण्याची सवय लागली तर भावी काळातील युवा पिढी सुदृढ तयार होईल, या उद्देशाने जिल्हा अधीक्षक कृषी विभागातर्फे शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या मनावर पौष्टिक तृणधान्यांचा आहार घेण्याचे बिंबवले जात आहे. शाळांमध्ये विविध स्पर्धा आयोजित करून जनजागृती करण्यावर भर दिला जात आहे.कृषी विभागाचा हा अभिनव उपक्रम बालकांपासून युवकांना सकस आहार घेण्याकडे प्रवृत्त करणारा ठरत आहे. या उपक्रमांचे सर्वत्र स्वागत होत आहे. गतिमान युगात सोशल मीडियाचा मोठा प्रभाव लहान विद्यार्थ्यांवर होत आहे. पुस्तकांऐवजी तसेच प्रत्यक्ष मैदानावर जाऊन खेळण्याऐवजी लहान मुले मोबाइल आणि व्हिडीओ गेममध्ये अडकल्याचे चित्र आहे. याचा विपरीत परिणाम डोळ्यांवर आणि शारीरिक वाढीवर होत आहे. लहान वयातच ४० टक्के विद्यार्थ्यांना चष्मा लागून विविध विकार जडल्याचे चित्र सर्वत्र आहे. यामुळे डिसेंबर २०२२ पासून जिल्ह्यातील शाळांमध्ये कृषी विभागाने जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातर्फे जिल्ह्यातील कृषी विभागाच्या माध्यमातून गावागावांतील प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा आणि आश्रमशाळांमध्ये जाऊन पौष्टिक तृणधान्यांची माहिती दिली जात आहे. रांगोळी, भित्तिपत्रक, चित्रकला, वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्यविषयक जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यातील सुमारे चारशे ते पाचशे शाळांमध्ये जाऊन पौष्टिक तृणधान्य शरीराला कसे उपयोगी आहे, त्याबाबत विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवले आहे.- उज्ज्वला बाणखेले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :alibaugअलिबाग