शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पारंपारीकतेची कास धरीत गणपतींचे विसर्जन, भावूकतेनं बाप्पांना निरोप

By निखिल म्हात्रे | Updated: September 1, 2022 23:18 IST

श्री गणरायांची कालच म्हणजे चतुर्थीच्या मुहूर्तावर स्थापना करण्यात आली होती.

अलिबाग - एक... दोन... तिन... चार... गणपतीचा जय जयकार..., गणपती बाप्पा मोरया या… पुढच्या वर्षी लवकर या... जयघोषांसह रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी गुरुवारी दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन झाले. बुधवारी मोठ्या आनंदाने व उत्साहात गणरायाचे घरोघरी आगमन झाले होते. मात्र, अनेकांच्या घरी परंपरेनुसार दीड दिवसातच बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. दुपारी तीन नंतर सहकुटुंब विसर्जनाला सुरुवात झाली. यावेळी कुटुंबियांनी बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला.

श्री गणरायांची कालच म्हणजे चतुर्थीच्या मुहूर्तावर स्थापना करण्यात आली होती. काल रात्री व आज दुपारपर्यंत असा दीड दिवस पकडला जातो. त्यानुसार आज दुपारी तीननंतर अनेकांनी विसर्जनाची तयारी केली. त्यानंतर विधिवत पूजा, आरती करून व नैवेद्य दाखवून तलावावर व नदीच्या ठिकाणी विसर्जनास सुरुवात केली. गणेश चतुर्थीच्या दिवशी आगमन झालेल्या दीड दिवस मुक्कामाच्या सार्वजनिक 12 तर 25 हजार 728 घरगुती गणपतींना गुरुवारी जिल्ह्यात ढोलताशाच्या गजरात, भजन-किर्तनात आणि गणपती गेले गावाला.. चैन पडेना आम्हाला असा गजर करीत निरोप देण्यात आला.जिल्ह्यात गणेश विसजर्नाच्या निमीत्ताने सर्व सामुद्र किनारे आज फुलून गेले होते. सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विसजर्न मिरवणुकांच्या निमीत्ताने कोठेही अनुचित प्रकाराची नोंद झाली नसल्याची माहिती रायगड जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाच्या सूत्रंनी दिली.गणेशोत्सव काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला असून राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी, होमगार्ड देखील बंदोबस्तासाठी तैनात आहेत. याबरोबर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी किनारा परीसरात वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यामुळे वाहतूक कोंडीतून भक्तांची चांगलीच सुटका झाली.

टॅग्स :alibaugअलिबागthaneठाणेRaigadरायगड