शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

'अलिबागमधील जिल्हा रुग्णालयाची तातडीने दुरुस्ती करा'

By राजेश भोस्तेकर | Updated: December 28, 2022 12:56 IST

आ. जयंत पाटील यांची अधिवेशनात शासनाकडे मागणी, लोकमत बातमीचा घेतला आधार

राजेश भोस्तेकरअलिबाग : अलिबाग मधील जिल्हा शासकीय रुग्णालयात दुरावस्थेबाबत लोकमत मार्फत वारंवार पाठपुरावा बातमीच्या रूपातून केला जात आहे. जिल्हा रुग्णालय व्हेंटिलेटरवर या मथळ्याद्वारे प्रसिद्ध केलेल्या बातमीचे कात्रण दाखवून शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला आहे. अलिबाग येथील रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयाची नादुरूस्त झाल्याने नवीन इमारत बांधण्याबाबत तातडीने कार्यवाही केली जावी, अशी आग्रही मागणी शेकापचे आ. जयंत पाटील यांनी मंगळवारी विधानपरिषदेत औचित्याचा मुद्याद्वारे सरकारकडे केली आहे.

जिल्ह्यातील सर्व सामान्य नागरिकांना हक्काचे रूग्णालय समजल्या जाणार्‍या जिल्हा सामान्य रूग्णालयाची अवस्था एखाद्या रूग्णासारखी झाली आहे. याबाबत लोकमतमध्ये सातत्याने आवाज उठविला जात आहे. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार जयंत पाटील यांनी लोकमत मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीचे कात्रण दाखवून रुग्णालयाच्या दुरावस्थेबाबात दृष्टिक्षेप टाकला. जिल्हा सामान्य रूग्णालयातील शस्त्रक्रीय कक्षाच्या छतातून गळती सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी एकही शस्त्रक्रीया न झाल्याने गरीब व गरजू रुग्णांना खाजगी रूग्णालय किंवा मुंबई, नवी मुंबईतील रूग्णालयाचा आधार घ्यावा लागत असल्यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे, असेही त्यांनी निदर्शनास आणले.

शस्त्रक्रिया विभागासह रूग्णालयाच्या आवश्यक दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने तसेच ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम करणे, या इमारतीवर आतापर्यंत १५ ते २० कोटीहून अधिक खर्च झाला असून सदर इमारत जीर्ण अवस्थेत आहे, असे ते म्हणाले.तसेच निकृष्ट काम करणार्‍या ठेकेदारावर व संबंधित अधिकार्‍यांवर तातडीने कारवाई करण्याची आवश्यकता असणे, तसेच या ठिकाणी कोणतीही मोठी दुर्घटना होवू नये यासाठी राज्य शासनाने नवीन इमारत बांधण्याची आवश्यकता आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :alibaugअलिबागhospitalहॉस्पिटल