शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मी आपल्यासोबत आहे - खा. सुनील तटकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 00:53 IST

प्रकल्पग्रस्तांची आंदोलनस्थळी घेतली भेट

नागोठणे : येथील आयपीसीएल (आताची रिलायन्स) कंपनीच्या उभारणीपासूनचा सर्व इतिहास मला ज्ञात आहे. सर्व प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळाली पाहिजे, या मताचा मीही आहे. मी आपल्यासोबत असून, तोडगा निघालाच पाहिजे, ही माझी भूमिका राहील. आपली जी काही भूमिका किंवा मागणी असेल, त्या दृष्टीने लक्ष घालीन, अशी ग्वाही खासदार सुनील तटकरे यांनी प्रकल्पग्रस्तांना दिली.  लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या माध्यमातून येथील प्रकल्पग्रस्तांनी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन चालू ठेवले असून, सतराव्या दिवशी रविवारी सायंकाळी उशिरा आंदोलनस्थळी भेट देऊन प्रकल्पग्रस्तांशी हितगुज साधले. यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.जी. कोळसे पाटील राष्ट्रीय संघटक राजेंद्र गायकवाड, जिल्हाध्यक्ष शशांक हिरे, स्थानिक अध्यक्ष चेतन जाधव, सरचिटणीस गंगाराम मिणमिणे आदींसह संघटनेचे पदाधिकारी, प्रकल्पग्रस्त गावांचे सरपंच आणि शेकडो प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली आहे. आंदोलन सुरू झाल्यानंतर प्रकल्पग्रस्त गावांतील सरपंचांनी यापूर्वी आपल्याला पाठिंबा दिला आहेच. मी आपल्या सोबतच असल्याचा पुनरुच्चार करताना खा.तटकरे यांनी सरकारच्या माध्यमातून आपले प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करेन, अशी ग्वाही दिली. आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढची पावले कशी उचलायची, याबाबत तातडीने चर्चा केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.लक्ष घालण्याची मागणी३० वर्षांपूर्वी सरकारने प्रकल्पग्रस्तांना लिहून दिले आहे, त्याच मागण्या आम्ही करीत आहोत. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी  संघटनेच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली, तेव्हा आमच्या त्यांच्यासमोर लेखी स्वरूपात दिल्या होत्या व कंपनीने त्याचे उत्तर दिले असून, ते आपल्याकडे लवकरच पोहोच केले जाणार आहे.  लक्ष घालावे, अशी मागणी कोळसे पाटील यांनी खा.तटकरेंकडे केली.