शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा वाळू उपसा सुरूच; स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 23:22 IST

अधिकृत वाळू व्यावसायिकअडचणीत

दासगाव : शासनाने काढलेल्या वाळू उपशाच्या लिलावात कोट्यवधी रु पये शासनाने भरून घेतलेला वाळू उपशाचा ठेका तालुक्यात सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशामुळे अडचणीत येत आहे. स्थानिक प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करून आहे. त्यातच शासनाने एकीकडे कोट्यवधी रुपये भरणाऱ्या वाळू उपशाच्या ठेक्याला पर्याय काढत सॅण्ड क्र शर प्लांटला देखील परवानगी दिली आहे. याचा फटका देखील या वाळू उपशाला बसत आहे.रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने ड्रेझरच्या साहाय्याने काढण्यात येत असलेल्या वाळू उपशाच्या ठेक्यासाठी लिलाव काढण्यात आला. सुरवातीला या लिलावाची रक्कम मोठी असल्याने आणि प्रत्यक्षात वाळू विक्र ीचे प्रमाण पाहून अनेकांनी या लिलाव प्रक्रि येकडे पाठ फिरवली. मात्र महिन्याभरापूर्वी या लिलाव प्रक्रि येतील यादरम्यानचा वाळू उपशाचा ठेका कोट्यवधी रु पये शासनाला भरून घेण्यात आला. गेल्या काही वर्षांपासून हातपाटीद्वारे वाळू उपसा बंद आहे. मात्र तालुक्यातील विविध ठिकाणी अनधिकृतपणे वाळू उपसा सुरू असल्याने हा वाळू उपसा ठेका अडचणीत आला आहे. या अनधिकृत वाळू उपशावर स्थानिक प्रशासनाचे कोणतेच निर्बंध नसल्याने राजरोसपणे ही वाळू बांधकाम प्रकल्पांवर येत आहे. महाड तालुक्यात नडगाव, देशमुख कांबळे, बिरवाडी, वाळण, मांघरून या भागात तर पोलादपूर तालुक्यातील सवाद, धारवली, हावरे लोहारमाळ, पार्ले, या भागात अनधिकृतपणे वाळू उपसा सुरू आहे. ही वाळू बांधकाम प्रकल्प, महाड औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या आणि लहान मोठ्या शासकीय बांधकामांवर देखील वापरली जात आहे. हा वाळू उपसा स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे होत आहे. बिरवाडीमधील इमारत बांधकाम प्रकल्पावर वापरली जाणारी वाळू बिनधास्तपणे रस्त्यावरच टाकलेली असते. याबाबत अनेक तक्रारी करून देखील तहसीलदार कार्यालय दुर्लक्ष करत आहे.शासनाने एकीकडे लिलाव प्रक्रि या करून वाळू उपसा करण्याचा ठेका दिला असतानाच दुसरीकडे क्र श वाळू प्रकल्पांना देखील परवानगी दिली आहे. नदीतील गोटा वापरून ही वाळू तयार केली जात आहे. ही वाळू देखील विविध शासकीय प्रकल्पांना वापरली जात आहे. याठिकाणी सीसीटीव्ही लावले जात नसल्याने प्रत्यक्षात किती क्रश वाळू निर्मिती झाली आणि वितरित झाली याची गणती होत नाही.लिलाव प्रक्रिया केलेल्या रेतीचा दर प्रति ब्रास ३६०० रु पये तर क्रश वाळूला ४०० रु पये अशी तफावत शासनाने ठेवली आहे. यामुळे शासनाची वाळू लिलाव प्रक्रि येतून अनेकजण माघार घेत आहेत. सध्या घेतलेला वाळू ठेका देखील अडचणीत आला आहे. विविध ठिकाणी सुरू असलेले वाळू उत्खनन, क्र श वाळू परवानगी यामुळे नुकसान सहन करावे लागत आहे.महाड तालुक्यात अनधिकृत वाळू उपसा होत असेल तर यावर कारवाई करण्यात येईल.- विठ्ठल इनामदार,प्रांताधिकारी, महाड