शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
6
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
7
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
8
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
9
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
10
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
11
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
12
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
13
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
14
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
15
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
16
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
17
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
18
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
19
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
20
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान

खाडीत अवैध रेती उत्खनन

By admin | Updated: September 25, 2015 02:23 IST

रोहा तालुक्यातील भालगाव खाडीत कांडणेमध्ये यंत्राच्या सहाय्याने रेतीचे अवैध सक्शन पंपाच्या सहाय्याने उत्खनन सुरु झाले आहे

रोहा : रोहा तालुक्यातील भालगाव खाडीत कांडणेमध्ये यंत्राच्या सहाय्याने रेतीचे अवैध सक्शन पंपाच्या सहाय्याने उत्खनन सुरु झाले आहे. या बेकायदा उत्खननावर रोह्याच्या तहसीलदार उर्मिला पाटील यांनी ठोस कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.रोहा तालुक्यात हातपाटीद्वारे रेती उत्खनन करण्यास जिल्हा महसूल शाखेने परवानगी दिली आहे. हातपाटीने रेती उत्खनन करण्याचा परवाना देताना शासनाने एका पानाचा परवाना आणि चार पानाच्या अटी संबंधित व्यावसायिकांना घातल्या आहेत. मिळालेल्या परवानगीप्रमाणे समुद्रात उड्या मारुन वाळूचे उत्खनन केले जात आहे. कांडणे खाडीत हातपाटीने रेती काढण्याचा परवाना अशोक केरु धोत्रे यांना देण्यात आला आहे. भालगाव हे गाव रोहा शहरापासून २२ किलोमीटर दूर दुर्गम भागात असल्याने तेथे सहसा शासकीय यंत्रणा नियमित पोहचत नाही. या खाडीत हातपाटीने रेती उत्खननाची परवानगी घेऊन त्याऐवजी सक्शन पंप, होड्या आदी यंत्रणेच्या सहाय्याने रेतीचे अवैध उत्खनन करण्याची शक्कल संबंधितांनी लढविलेली आहे. मात्र जागृत नागरिकांमुळे त्यांना येथे चोरी छुपे रात्रीबेरात्री रेतीचे उत्खनन व वाहतूक करावी लागत आहे. या गैरप्रकारामुळे सतत वादविवाद होऊन परिसरातील सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले असून शासकीय यंत्रणा आणि जिल्हा पोलिसांनी वेळीच या अवैध रेती उपशावर कारवाई न केल्यास भविष्यात या भागात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जाधव यांनी सांगितले आहे. रात्रीच्या दरम्यान रोहा दमखाडी परिसरात व शहरातील इतर बिल्डरांना इमारतीच्या बांधकामासाठी ही वाळूचा पुरवठा केला जात आहे. जिल्हाधिकारी शीतल उगले आणि पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी हातपाटीद्वारे उत्खनन करण्याचा परवाना दिलेल्या व्यावसायिकांकडे विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे. (वार्ताहर)