शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

अवैध खोदकाम व झाडांची कत्तल, कुरुळच्या महिला आक्रमक, तहसीलदारांना दिले निवेदन

By निखिल म्हात्रे | Updated: October 9, 2023 18:26 IST

काळवे व शिंपल्या विकून आपल्या कुटूंबियाचा उदर निर्वाह करणाऱ्या महीलां याबाबत आवाज उठवायला सुरुत केली आहे. 

अलिबाग - कुरुळ गावातील महिला गेले अनेक वर्ष खाडीतील कालवे, शिवल्या खणून आपले चरीतार्थ चालवित. मात्र आता कोकण बार्ज या कंपनीने या खाडीत गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत उत्खनन करीत आहे. त्यामुळे या गावातील महीलांचा चरीतार्थावरच घाव घातला आहे. काळवे व शिंपल्या विकून आपल्या कुटुंबियाचा उदर निर्वाह करणाऱ्या महिला याबाबत आवाज उठवायला सुरुवात केली आहे. 

सोमवारी कुरुळ येथील महिला एकत्र येत कोकण बार्ज कंपनी विरोधात अलिबाग तहसीलदार विक्रम पाटील यांना निवेदन दिले. तसेच आमदार महेंद्र दळवी यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या आहेत. यावेळी कुरुळ गावच्या सरपंच अॅड. सुलभा पाटील, सदस्य भुषण बिर्जे, अवधूत पाटील, आकाश घाडगे, अॅड. योगेश घाडगे, अभिजीत घाडगे, वंदना घाडगे, रंजना पाटील, आलका म्हात्रे, सुजाता कार्लेकर, नलीनी पाटील आदी उपस्थित होते.

कुरुळ खाडीतुन मिळणा-या उत्पनावर या महिलांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. कोरोना काळात संपुर्ण व्यवहार बंद असताना खाडीतील शिवल्या व कालवे विकून उदरनिर्वाह चालविला होता. आता मागील वीस दिवसांपासून कोकण बार्ज कंपनीमध्ये मोठी जहाजे बनतात सध्या कंपनी खाडीच्या क्षमतेपेक्षा मोठी जहाजे खाडीतुन येत आहेत. 

कंपनीने ग्रामस्थांना विश्वासास न घेता अवैध रित्या खाडीमध्ये मँग्रोज ची मोठी प्रमाणात तोड करीत कुरुळ खाडीतील सुमारे १५०० ब्रास वाळू मिश्रीत रेती चे उत्खनन केल्याचे ग्रामस्थांना दिसून आले. या वाळु मिश्रित रेती मध्येच तिस-या व कालवे यांचे नैसर्गिक रित्या उत्पादन होते. जर असेच अवैध रित्या उत्खनन चालु राहिले तर कुरुळ गावातील व परिसरातील सुमारे २०० हुन अधिक कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल.

मागील साठ वर्षांपासून आमच्या गावातील महीला खाडीतील शिवळ्या व काळवे विकून कुटूंबाचा चरीतार्थ चालवितात. मात्र हि कोकण बार्ज कंपणी आमच्या महीलांचा रोजगार हिरावून घेत आहे. सतत होणारे खाडीतील खोदकाम थांबविण्यासाठी आम्ही कंपणी प्रसासनासोबत बतचीत हि केली मात्र कंपणीच्या अधिकाऱ्यांनी थातूक-मातूर उत्तरे देऊन वेळ मारून नेली.- अॅड. सुलभा पाटील, सरपंच.

कोकण बार्ज कंपणी कोणालाही जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. अनेकवेळा समजूतीने घेऊनही या कंपणीने हम करे सो कायदा चालविला आहे. सतत असेच होत राहील्यास कोणताही अनुसुचित प्रकार घडला तर कायदा व व्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी हि प्रशासनाची असेल. कंपणी प्रशासना विरोधात केलेल्या अर्जाचा आपण जाणीव पुर्वक विचार करून आम्हा गावकऱ्यांना योग्य तो न्याय दयावा.- भुषण बिर्जे, सदस्य.

आमच्यावर अन्याय करणाऱ्या कंपणीवर कायदेशिर कारवाई झाली नाही तर आम्ही महिला आपल्या कार्यालया समारे उपोषणास बसु. आमच्या न्याय व हक्कासाठी आम्ही असाच लढा देत राहू.- रेश्मा घाडगे, गावकरी महिला.

टॅग्स :alibaugअलिबाग