शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

मेंदडी बलात्कार प्रकरणामुळे अवैध दारू धंद्याचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 02:01 IST

तालुक्यातील मेंदडी गावातील आदिवासी महिलेवर ती दारूच्या नशेत असताना जंगलात नेऊन दोन नराधमांनी २९ जुलैच्या रात्री बलात्कार केला.

म्हसळा : तालुक्यातील मेंदडी गावातील आदिवासी महिलेवर ती दारूच्या नशेत असताना जंगलात नेऊन दोन नराधमांनी २९ जुलैच्या रात्री बलात्कार केला. त्यासंदर्भात काशिनाथ वाघमारे व किसन जाधव या आरोपींना म्हसळा पोलिसांनी अटक केली. ३१ जुलैला दोघांनाही न्यायालयात हजर केले असता त्यांना ८ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. या बलात्काराच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना पीडित महिला ज्या दारूच्या गुथ्यावर दारू पिण्यासाठी गेली होती त्या दारूच्या गुथ्यावर म्हसळा पोलिसांनी धाड टाकून ८२०० किमतीची तब्बल १०० लिटर दारू जप्त केली. संबंधित अवैध दारू विक्रे त्यावर म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल के लाआहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्गापासून ५०० मीटर अंतर हद्दीतील सर्व देशी व विदेशी दारूची दुकाने, परिमट रूम व बीअर बार १ एप्रिल २०१७ पासून बंद झाले आहेत. त्यामुळे तळीरामांची तहान भागविण्यासाठी अनेक अवैध दारूचे धंदे शहरासहित अनेक गावांमध्ये सुरू झाले आहेत. यासंदर्भात राज्य उत्पादन शुल्क खात्याचे ए.एस.आय. हाके यांनी म्हसळा पोलिसांकडून १ एप्रिल २०१७ नंतर केलेल्या आठ कारवायांमध्ये देशी दारू १६.५६ लिटर, गावठी दारू ५३६.५ लिटर तर ४० लिटर माडी अशी ४८,७०४ रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली आहे व अवैध दारू विक्रे त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे असेसांगितले.एका आदिवासी महिलेवरील बलात्कार प्रकारामुळे जरी एक अवैध दारू धंद्यावर कारवाई झाली असली तरी असे अनेक अवैध दारू विक्रे ते बेधडक दारू विक्र ी करीत आहेत.