शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नद्यांचे रक्षण केले तर पर्यावरण संवर्धन होईल

By admin | Updated: February 2, 2016 02:03 IST

नद्यांमध्ये होणारे पाणी प्रदूषण कमी करण्याची गरज आहे, तसे न झाल्यास नद्यांचे जिवंतपण हरवून जाईल आणि प्रदूषित नद्यांच्या संख्येत वाढ होईल

नेरळ : नद्यांमध्ये होणारे पाणी प्रदूषण कमी करण्याची गरज आहे, तसे न झाल्यास नद्यांचे जिवंतपण हरवून जाईल आणि प्रदूषित नद्यांच्या संख्येत वाढ होईल, त्यामुळे जिवंत नद्यांचे रक्षण करण्याचे आवाहन जीवित नदी अभियानाच्या शैलजा देशपांडे यांनी केले. नेरळ येथे नद्या जिवंत ठेवण्यासाठी जनजागृती मोहीम उघडली आहे, त्यावेळी पर्यावरणप्रेमी देशपांडे बोलत होत्या.पुणे येथे जीवित नदी अभियान राबविणाऱ्या शैलजा देशपांडे यांच्या अभियानाचे काम कर्जत तालुक्यात सामाजिक कार्यकर्त्या संध्या देवसस्थळे यांनी सुरु केले आहे. त्या माध्यमातून नेरळच्या कोतवालवाडी ट्रस्ट येथे महिलांना आणि नेरळ ग्रामपंचायतमध्ये आरोग्य विभागाच्या कर्मचारी यांना नद्या जिवंत कशा ठेवायच्या याबद्दल शैलजा देशपांडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. त्याआधी जीवितनदी अभियान अंतर्गत जनजागृती कार्यशाळा नेरळ मधील विद्या विकास शाळेत आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष बल्लाळ जोशी, पर्यवेक्षिका अरु णा जोगळेकर, तसेच अनेक शिक्षक,विद्यार्थी आणि पुढाकार घेणाऱ्या संध्या देवसस्थळे उपस्थित होत्या. विद्यार्थी यांच्या माहितीसाठी पुणे येथील मुठा नदीमध्ये या अभियान अंतर्गत करण्यात आलेल्या कामाची माहिती देणारे फलक लावण्यात आले होते. तर नंतर पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या शैलजा देशपांडे यांनी नेरळ विद्या विकास शाळेत विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला.देशपांडे यांनी देशातील सर्वच नद्या मृत झाल्या असल्याचा दावा त्यावेळी केला. ज्यावेळी नद्या उगम पावते त्यावेळी ती जिवंत असते परंतु पठारावर गेल्यानंतर ती मृत होते अशी माहिती त्यांनी दिली. मृत झालेली नदी कशी ओळखायची याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देतांना त्यांनी ज्या ठिकाणी नदीमध्ये जलपर्णी वाढते तेथे मोठ्या प्रमाणात बगळे आणि कावळे जमा झालेले असतात.त्यावरून ती नदी मृत आहे असे समजावे अशी माहिती देशपांडे यांनी दिली.(वार्ताहर)