शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

किनारे स्वच्छ असतील तर पर्यटक वाढतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 01:55 IST

महाराष्ट्रातील सागरी किनारे सुंदर व स्वछ राहण्यासाठी मंडळाकडून पुढाकार घेण्यात आला असून यासाठी काही रकमेची बक्षिसेसुद्धा ठेवण्यात आली आहेत.

नांदगाव/ मुरूड/बोर्ली-मांडला : महाराष्ट्रातील सागरी किनारे सुंदर व स्वछ राहण्यासाठी मंडळाकडून पुढाकार घेण्यात आला असून यासाठी काही रकमेची बक्षिसेसुद्धा ठेवण्यात आली आहेत. महाराष्ट्रात दरवर्षी ३० लाखांपेक्षा जास्त पर्यटक फिरावयास येतात. सागरी किनारे स्वच्छ असतील तर पर्यटकांची संख्या वाढून स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. यामुळे देशाला परकीय चलन मिळून देशाची आर्थिक सुबत्ता वाढणार आहे. तेव्हा समुद्रकिनारे स्वच्छ ठेवताना स्थानिक नागरिकांचे सहकार्यसुद्धा मंडळास मिळाले पाहिजे तरच ही मोहीम यशस्वी होईल, असा विश्वास महाराष्ट्र सागरी मंडळाचे प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन सुरज नाईक यांनी व्यक्त केला.गांधी जयंतीनिमित्त या स्वछता मोहिमेचा शुभारंभ प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन सुरज नाईक यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून व महात्मा गांधी यांच्या तसबिरीला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आला.या वेळी काशीद समुद्रकिनारी जे ५० स्टॉलधारक आहेत त्यांना कचरा टाकण्यासाठी ५० कचरापेट्यांचे वाटप नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. सदरील कचरापेट्या निर्मल सागर तट अभियानांतर्गत मिळालेल्या निधीमधून देण्यात आल्या आहेत.महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्मल सागर तट अभियानांतर्गत सागरी किनारे स्वच्छ करण्यासाठी १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर हा पंधरवडा साजरा करण्यात आला होता. त्याप्रमाणे सोमवारी या स्वछता मोहिमेचा शेवट गांधी जयंतीनिमित्ताने करण्यात आला. स्वछता मोहिमेचा प्रसार होण्यासाठी काशीद माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन स्वच्छतेविषयी लोकांमध्ये जागृती होण्यासाठी घोषणा देऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यातआला.या वेळी या स्वछता मोहिमेत कोस्ट गार्ड, काशीद समुद्रकिनारी जलक्र ीडा करून पर्यटकांचे मनोरंजन करणारे सर्व कामगार तसेच मालक, शालेय विद्यार्थी, काशीद ग्रामस्थ आदींनी या स्वछता मोहिमेत सहभाग घेऊन काशीद येथील समुद्रकिनारा स्वच्छ केला.या मोहिमेत प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन सुरज नाईक, काशीद ग्रामपंचायत सरपंच सविता वालेकर, ग्रामसेवक अंकुश शेळके, सामाजिक अधिकारी रोहिदास लोभी, कोस्ट गार्डचे वरिष्ठ अधिकारी अनुप कुमार आदीं मान्यवरांनी सहभाग घेतलाहोता.