शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

तुफानाची चाहूल देणारा पक्षी ‘आडय’ची ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 06:05 IST

मच्छीमार बांधवांना समुद्री तुफानाची सूचना देणाºया सागरी जलचरांच्याही वरचे स्थान या ‘आडय’ पक्षाला आहे.

अमुलकुमार जैन ।बोर्लीमांडला : मच्छीमारांचा समुद्रातील अत्यंत जवळचा मित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘आडय’ पक्ष्यांनी भरसमुद्रात अनपेक्षितपणे येत असलेल्या तुफानाची सूचना देत, हजारोंच्या संख्येने समुद्रातून उत्तरेच्या दिशेने स्थलांतर केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत सागरी तुफानाने कोकण किनारपट्टीला धडक दिली. मात्र, तत्पूर्वी ‘आडय’ पक्ष्यांनी दिलेल्या सूचनेनुसार व त्याच दरम्यान हवामान खात्यानेही दिलेल्या इशाºयानुसार मच्छीमार बांधव किनाºयावर सुखरूप पोहोचल्याने वित्त व जीवितहानीपासून किनारपट्टी बचावल्याचे बोर्ली येथील मच्छीमार राजू शिने यांनी सांगितले.१४ एप्रिलपासून किनारपट्टीवर धडकलेले तुफान स्थानिक मच्छीमार बांधवांना पूर्णपणे अनपेक्षित असेच होते. खोल समुद्रात मच्छीमार आपापल्या होड्या व ट्रॉलर घेऊन मच्छीमारी करीत होते. १९ एप्रिलच्या दरम्यान खोल समुद्रातील बेटांवर वास्तव्य करून असणारे ‘आडय’ नावाचे पक्षी अचानकपणे हजारोंच्या संख्येने मोठ्याने चिवचिवाट करीत अतिशय वेगाने उत्तरेच्या दिशेने प्रस्थान करताना मच्छीमारांना आढळून आले. त्यांचे हे प्रस्थान म्हणजे येणाºया तुफानाची चाहूल, हे समीकरण ठरलेलच असते. एरवी समुद्रात स्थिरावणाºया या पक्ष्यांना निसर्गातील येऊ घालणाºया घडामोडींची आगाऊ सूचना कशी मिळते कुणास ठाऊक? त्यांना ही दैवी देणगीच असते.मच्छीमार बांधवांना समुद्री तुफानाची सूचना देणाºया सागरी जलचरांच्याही वरचे स्थान या ‘आडय’ पक्षाला आहे. हा पक्षी सागरी तुफानाची अचूक कल्पना मच्छीमार बांधवांना देतो. त्यामुळे सावध झालेले मच्छीमार ताबडतोब किनारपट्टीच्या दिशेने परतू लागतात आणि त्यामुळे जीवित आणि वित्तहानी टळते.१९ एप्रिल रोजी या पक्ष्यांनी खोल समुद्रातील मच्छीमार बांधवांना सावध करीत किनारपट्टी सोडली. दुसºयाच दिवशी हवामान खात्याने समुद्री तुफानाचा इशारा देत, मच्छीमारांना माघारी परतण्याच्या सूचना केल्या आणि या पक्ष्यांचे आणि हवामान खात्याने दिलेले इशारे मानल्यामुळे किनारपट्टीवरील मोठा अनर्थ टळला.

टॅग्स :fishermanमच्छीमार