शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

हुतात्मा भाई कोतवालांना आदरांजली

By admin | Updated: January 4, 2016 02:01 IST

हुतात्मा वीर भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांना भारतीय स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरु द्ध लढताना २ जानेवारी १९४३ ला सिद्धगड येथे वीरगती प्राप्त झाली.

कर्जत : हुतात्मा वीर भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांना भारतीय स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरु द्ध लढताना २ जानेवारी १९४३ ला सिद्धगड येथे वीरगती प्राप्त झाली. त्यांच्या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी २ जानेवारीला दरवर्षी कर्जत तालुक्यातील मानिवली हुतात्मा स्मारकात या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येते. शनिवारी या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. हुतात्मा वीर भाई कोतवाल व हुतात्मा हिराजी पाटील यांचा स्मृतिदिन शनिवारी सकाळी १० वाजता पंचायत समिती कर्जत, ग्रुप ग्रामपंचायत मानिवली, हुतात्मा स्मारक समिती व केंद्र दहीवली-मालेगाव यांच्या विद्यमाने मानिवली येथील स्मारकाच्या प्रांगणात करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी हुतात्मा वीर भाई कोतवाल, हिराजी पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करू अभिवादन केले. हुतात्म्यांच्या नातेवाइकांचाही सत्कार करण्यात आला. हुतात्मा हिराजी पाटील यांच्या पुण्यभूमीतून ज्योत पेटवून ही मशाल संपूर्ण मानिवली गावात फिरून गावातील तरु ण मशाल घेऊन सिद्धगडावर जातात. २ जानेवारीला सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी हुतात्मा ज्योत प्रज्वलित करून हुतात्म्यांना मानवंदना दिली. तसेच मानिवली येथील हुतात्मा स्मारकात खांडस विभागातील २२ शाळांनी विविध संस्कृतिक कार्यक्र म, देशभक्तीपर गीते सादर केली. यावेळी आमदार सुरेश लाड आदी उपस्थित होते. (वार्ताहर)