शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

माणुसकीचे अतुलनीय दर्शन : मदतीसाठी सरसावले शेकडो हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 01:26 IST

माणुसकीचे अतुलनीय दर्शन : पुरात अडकलेल्यांची सुखरूप सुटका

कांता हाबळे 

नेरळ : गेल्या दोन दिवसात पडलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अचानक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने शेकडो लोक अडकून पडले. रेल्वे आणि रस्ते वाहतूक कोलमडून पडल्याने आता करायचं काय असा प्रश्न या पूर सदृश्य परिस्थितीत अडकून पडलेल्या नागरिकांना पडलेला असताना त्यांच्यासाठी असंख्य हात सरसावले आहेत. जेवण आणि राहण्याची सोय उपलब्ध झाल्याने या सगळ्यातून माणुसकीचे अतुलनीय दर्शन घडले आहे.

२६ जुलै २००५ मध्ये आलेल्या महापुरानंतर २६ जुलै ही तारीख महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनात धडकी भरावणारी ठरली. यावर्षीही असाच २६ जुलै शुक्रवार सकाळपासून सुरू झालेल्या संततधार पावसाने प्रत्येकाच्या मनात धडकी भरवली; आणि ज्याची भीती होती तेच झाले. शुक्रवार सायंकाळपासून रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातील उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली. पाहता-पाहता रस्त्यात पाणी साठायला लागले तर रेल्वे रुळांवरही पाणी भरले. त्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली आणि त्याबरोबर प्रमुख राज्य मार्ग व महामार्गही ठप्प झाले. या सगळ्यात प्रवास करणारे प्रवासी नागरिक अडकून पडले. शुक्रवारी सुरू झालेला पाऊस शनिवारी सायंकाळपर्यंत मुसळधार सुरूच राहिल्याने अडकून पडलेल्या नागरिकांसाठी सर्व स्तरातून मदतीसाठी अनेक हात पुढे आले.नेरळ रेल्वे स्थानकात व परिसरात अडकलेल्या नागरिकांसाठी नेरळ ग्रामपंचायतीच्या सरपंच जान्हवी साळुंके व उपसरपंच अंकुश शेळके यांनी ग्रामपंचायतीची दालने मोकळी केली. त्यांची ग्रामपंचायतीत राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली. तर नेरळमधील आगरी समाज संस्थेने हुतात्मा हिराजी पाटील सभागृह नागरिकांसाठी उघडे केले, त्याठिकाणीही जेवणाची व्यवस्था करण्यात आली. कर्जत जैन बांधव संघटनेतर्फे असिफ मिर्झा, गिरीश कांबळे व रोटरी क्लब कर्जतचे कार्येकर्ते यांच्या वतीने कर्जत रेल्वे स्थानकावर अडकून पडलेल्या मेल गाड्यांमधील प्रवाशांना जेवण, नाष्टा, चहा, बिस्कीट देण्यात आली. कर्जत शहरात पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिक व प्रवाशांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राष्ट्रवादी भवन येथे व्यवस्था करण्यात आली होती. तर कोंढाणा ग्रुप या सोशल मीडिया ग्रुपचे अडमिन व सदस्य यांनीही प्रवाशाची आस्थेने विचारपूस करून बिस्कीट, पाणी व जेवणाची व्यवस्था केली.

या नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेक जण अडकून पडले होते. काहींच्या घरात पाणी शिरल्याने त्यांना सुरक्षित स्थळी हलविणे गरजेचे असल्याने या आपत्तीत मदतीसाठी अनेक हात सरसावले. या कार्यात अनेक संस्था व व्यक्ती सारसावल्याने सर्व स्तरातून या माणुसकीचे दर्शन घडले. 

टॅग्स :Raigadरायगडraigad-pcरायगड