शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो एकर जमिनीचा घोटाळा

By admin | Updated: February 7, 2016 00:25 IST

तालुक्यात बनावट दस्तावेज तयार करून जमिनींची खरेदी-विक्री केल्याची अनेक प्रकरणे उघडकीस येत असून, वाळण विभागातील पाने गावाजवळील शेकडो एकर जमिनींचा

- संदीप जाधव , महाड तालुक्यात बनावट दस्तावेज तयार करून जमिनींची खरेदी-विक्री केल्याची अनेक प्रकरणे उघडकीस येत असून, वाळण विभागातील पाने गावाजवळील शेकडो एकर जमिनींचा बनावट दस्तावेजाद्वारे गैरव्यवहार झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. पंचवीसहून अधिक शेतकऱ्यांची या गैरव्यवहार प्रकरणात फसवणूक झाली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रामीण पोलीस ठाण्यात या फसवणूक प्रकरणी पाच गुन्हे दाखल झाले आहेत. गेल्या महिन्यात या गैरव्यवहार प्रकरणी चार गुन्हे दाखल झाले होते. स्थानिक दलालांसह एकूण १० जणांवर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असले तरी यापैकी कोणालाही अद्याप अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.मे २०१४ ते जून २०१५ दरम्यानच्या काळात तालुक्यातील पाने येथील सहदेव बाबाजी दानावले (७०), तुकाराम धोंडू करोजे (६५), राजाराम नथुराम शिंदे (६५), रामदास भानुराव कनोजे (६०) या शेतकऱ्यांच्या मालकीची शेतजमीन बनावट ओळखपत्रांसह अखत्यारपत्र तसेच बनावट दस्तऐवजाच्या आधारे जमिनीची परस्पर विक्री केल्याची बाब या शेतकऱ्यांच्या निदर्शनास आली. दुय्यम निबंधक महाड व माणगाव येथे या जमिनींची दस्त नोंदणी झाल्याचे उघडकीस आले. फसवणुकीप्रकरणी संबंधित शेतकऱ्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायालयाने ग्रामीण पोलिसांना दिले.पाने गावातील या जमीन गैरव्यवहार प्रकरणी आतापर्यंत नऊ गुन्हे दाखल झाले असले तरी या गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य सूत्रधार मात्र मोकाटच असल्याचे समजते आहे. पोलीस निरीक्षक ए.बी. पाटील हे या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत. न्यायालयाच्या आदेशाने १० जणांवर गुन्हेबबन धोंडीबा मोहिते, रावजी धोंड सालेकर, तुकाराम गंगाराम पवार (पंदेरी), रमेश परशुराम कालगुडे (केतकी कोंड वाळण), विष्णू गंगाराम शेलार, नामदेव किसन नवगणे, प्रवीण वसंत ठाणेदार, विजय अनंतराव दिघे, दिलास भिवाजी कोतवाल (सर्व रा. पुणे), लक्ष्मण बाजीराव निंभोरे (पुणे) या १० जणांवर न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल झाला आहे.