शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत नगरपरिषद हद्दीत शंभर टक्के प्लॅस्टिकबंदी यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 02:12 IST

राज्य सरकारने २३ जूनपासून प्लॅस्टिकबंदी केली आहे, मात्र कर्जत नगरपरिषद हद्दीत प्लॅस्टिकबंदीची अंमलबजावणी जानेवारी २०१८ पासून झाली होती

कर्जत : राज्य सरकारने २३ जूनपासून प्लॅस्टिकबंदी केली आहे, मात्र कर्जत नगरपरिषद हद्दीत प्लॅस्टिकबंदीची अंमलबजावणी जानेवारी २०१८ पासून झाली होती. शंभर टक्के प्लॅस्टिकबंदीसाठी नागरिक, दुकानदार यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. याचे श्रेय मुख्याधिकारी रामदास कोकरे यांना आणि जनतेला जात आहे.कर्जत नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा पदभार घेतलेल्या रामदास कोकरे यांनी पहिल्या दिवसापासून प्लॅस्टिक पिशवीला विरोध केला आणि नगरपरिषद हद्दीत ओला आणि सुका कचरा संकलन केला जाईल असा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. सुरवातीस याला विरोध झाला. मात्र आज नगरपरिषद हद्दीतील ओला आणि सुका कचरा वेगवेगळा गोळा होतोय. ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस प्रकल्प उभा आहे आणि त्यापासून वीजनिर्मिती होत असून बायोगॅस प्रकल्पाच्या बाजूचा रेल्वे पूल ते उल्हास नदी या रस्त्यावरील पथदिवे या माध्यमातून पेटत आहेत.दूध डेअरीवाल्यांनीही प्लॅस्टिक पिशव्या बंद केल्या आहेत. आता डेरीत किटल्या ठेवल्या आहेत. ग्राहकांनी किटली आणली नाही तर डेरी मालक १०० रुपये डिपॉझिट घेवून किटलीत दूध देतो. किटली परत दिल्यावर डिपॉझिट परत अशा पध्दतीने सध्या दूधडेरीचा व्यवसाय सुरू आहे. प्लॅस्टिक पिशवी बंद असल्याचा फलक सुद्धा लावला आहे आणि ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन फलकांव्दारे केले आहे. मात्र याचा परिणाम दूध विक्रीवर झाला आहे.नगरपरिषदेच्या ओला आणि सुका कचरा संकलनामुळे कर्जत हद्दीत डंपिंग ग्राउंड राहिले नाही. वेगवेगळ्या कचरा संकलनामुळे नगरपरिषदेला उत्पन्न मिळणे सुरू झाले आहे. नगरपरिषद प्रशासनाने आता कचरा संकलनासाठी सहा नवीन मिनी गाड्या खरेदी केल्या आहेत.