शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
2
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
3
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
4
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
5
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
6
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
7
टीनएजर्ससाठी अलर्ट! सुंदर दिसण्याची हौस भलतीच महागात; 'स्किनकेअर'ची क्रेझ धोकादायक
8
IND vs AUS : टिम डेविडची वादळी खेळी! पठ्ठ्यानं मोडला सूर्या दादाचा मोठा विक्रम
9
कामगाराच्या खात्यात चुकून आले ₹८७,०००००, त्याने बोनस म्हणून उडवले, बॉसवर आली डोक्यावर हात मारण्याची वेळ 
10
iPhone 16: आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर २५००० रुपये वाचवा; कुठं मिळतोय इतका स्वस्त?
11
६० का लगता नही कहीं से! अक्षय कुमारच्या शाहरुखला हटके शुभेच्छा; म्हणाला, "शकल से ४०..."
12
"56 इंचाची छाती असून, अमेरिकेपुढे झुकतात", राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
13
युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोनहल्ला, तुआप्से बंदरात घडवला मोठा विध्वंस, ऑईल टर्मिलन जळाले  
14
PM किसानचा २१वा हप्ता कधी येणार? मोठी अपडेट समोर! 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाहीत २००० रुपये
15
‘सत्याचा मोर्चा’त शरद पवारांचे विधान; शिंदे गटाचे नेते म्हणाले, “५० वर्ष सत्ता भोगली...”
16
मुंबईतील कॉन्सर्टवेळी 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली मलायका अरोरा, नेटकरी म्हणाले, "अर्जुनपेक्षा भारी..."
17
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
18
IND-W vs SA-W Final : टॉस आधी पावसाची बॅटिंग! मेगा फायनलमध्ये ५०-५० षटकांचा खेळ होणार का?
19
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
20
तंत्रज्ञानाची किमया! चित्रपट पाहत असताना...; Apple वॉचमुळे वाचला २६ वर्षीय तरुणाचा जीव

रायगडच्या बाजारपेठांमध्ये नागरिकांची प्रचंड गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 00:43 IST

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा : कोरोनाचा पडला विसर

अलिबाग : सोमवारपासून लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केल्यानंतर जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये लोकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. लॉकडाऊनचे नियम काहीसे शिथिल केल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नागरिकांच्या या आततायीपणामुळे पोलीस प्रशासनही या रांगा बघून हतबल झाल्याचे दिसले. बाजारपेठा, दुकाने या ठिकाणी सामाजिक अंतर राखण्याबाबतचे नियम धाब्यावर बसवण्यात आले.

नागरिक कुठलेही कारण सांगून घराबाहेर पडत असल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिकांनी अशी गर्दी केल्यास कोरोनाचा प्रसार कसा रोखणार, असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे. कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता केंद्र शासनाकडून देशभरातील लॉकडाऊनमध्ये ३० पर्यंत वाढ केली होती. रायगड जिल्ह्यातील काही भागातच कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांव्यतिरिक्त इतर दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. त्यामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून घरांमध्ये अडकून पडलेले नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी बाहेर पडले. खरेदीसाठी त्यांनी दुकानांबाहेर गर्दी केली होती. काहीच दिवसांमध्ये पावसाला सुरुवात होणार आहे. तसेच वादळही येऊन गेल्याने घरांच्या छपरावर ताडपत्री, प्लॅस्टिकचा कागद टाकणे गरजेचे असल्याने अशा वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिक बाहेर पडल्याचे दिसत होते. मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी असल्याने एकमेकांमध्ये सामाजिक अंतर राखण्यात त्यांना अपयश आले अथवा तो नियम त्यांनी पायदळी तुडवल्याचे स्पष्ट दिसत होते.एका रस्त्यावरील किंवा गल्लीमधील दुकानातही गर्दी केली जात आहे. त्याचबरोबर सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंतच ही दुकाने सुरू राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. उर्वरित कालावधीमध्ये संचारबंदी लागू राहणार आहे.सरकारी कार्यालयांसह विविध खासगी कंपन्या, खाजगी कार्यालयांमध्ये आज नेहमीपेक्षा जास्त कर्मचारी हजर असल्याचे दिसून आले. त्यामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून ओसाड पडलेल्या रस्त्यांवर वर्दळ वाढली होती. मार्केटमध्ये वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे पोलीसही वेळोवेळी बाजारपेठेत जाऊन नागरिकांना गर्दी कमी करण्याचे आवाहन करीत होते.