शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी निधीविना स्वबळावर घरोघर पाणीयोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 03:06 IST

पाणीटंचाईवर मात करण्याची खरी ताकद ग्रामस्थांच्याच हातात आहे. मात्र, यासाठी पुढाकाराची आवश्यकता आहे.

अलिबाग : पाणीटंचाईवर मात करण्याची खरी ताकद ग्रामस्थांच्याच हातात आहे. मात्र, यासाठी पुढाकाराची आवश्यकता आहे. समाजहितासाठी व्यक्तिगत स्वार्थ बाजूला ठेवून एखादा तरु ण पुढाकार घेतो, वेळप्रसंगी कर्ज काढून पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास नेतो, त्याच्या पाठीशी संपूर्ण गाव उभे राहते. अलिबाग तालुक्यातील परहूरपाडा गावात ‘लोकमत’चे वार्ताहर सुनील बुरुमकर यांनी हे शक्य करून दाखवले आहे.शासकीय निधीची वाट न पाहता स्वखर्चाने घरोघर नळाने पाणीपुरवठा योजना राबविणारे परहूरपाडा गाव राज्यातील पहिले आदर्शवत गाव आहे, असे प्रतिपादन रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सोमवारी केले.ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्याने परहूरपाडा गावातील घरोघर नळाने पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी सेवाशक्ती पतसंस्थेचे चेअरमन सीताराम कवळे, जाखमाता पतसंस्थेचे चेअरमन जे. पी. घरत, परहूरपाडा पाणीपुरवठा समितीचे सदस्य सुभाष पाटील, सुधीर नाईक, आशा नाईक आदी उपस्थित होते.बुरुमकर यांनी पुढाकार घेऊन ३३० घरांना घरपोच नळपाणी योजना केवळ १३ लाख २५ हजार रुपये खर्चामध्ये राबविली. यासाठी आठ लाख २५ हजार रुपये लोकवर्गणी आणि उर्वरित पाच लाख रु पये स्वत: कर्ज काढून योजना पूर्ण केली. ग्रामस्थांच्या या एकीचे कौतुक करताना जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले, ही योजना पाणीटंचाईवर मात करीत संजीवनी ठरली असून, आनंदाची झुळूक देणारी योजना आहे. शासकीय योजना लोकसहभागाच्या अभावामुळे कुचकामी ठरत असताना परहूरपाडा ग्रामस्थांनी कोणत्याही शासकीय निधीची वाट न पाहता ती पूर्ण केली. सर्व ग्रामस्थांना बरोबर घेत १०० टक्के लोकसहभागातून राबविलेल्या या योजनेचा अभ्यास इतर गावांनीही करण्यासारखा असल्याचेही सांगितले.योजनेसाठी कर्ज काढून पुढाकारज्येष्ठ ग्रामस्थ रमेश पाटील म्हणाले, सुनील बुरुमकर यांनी कोणताही स्वार्थ न ठेवता गावच्या पाणीपुरवठा योजनेसाठी कर्ज काढून पुढाकार घेतल्याने संपूर्ण ग्रामस्थांमध्ये एकीची भावना निर्माण झाली. यासाठी संपूर्ण पाणीपुरवठा समितीने कोणतीही राजकीय मदत न घेता केलेले काम आदर्शवत आहे.महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवलामहिला ग्रामस्थ वैष्णवी खोपकर म्हणाल्या, महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरवून ग्रामस्थांनी एकप्रकारे महिलांचा सन्मानच केला आहे. गावासाठी प्रत्येकाला काहीतरी करण्याची ऊर्मी असते; परंतु त्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असते. परहूरपाड्यामध्ये सुनील बुरु मकर यांनी पुढाकार घेऊन समाजासाठी नवा आदर्श घालून दिला आहे.परहूरपाडा गावात राबविण्यात येणाऱ्या संपूर्ण योजनेची माहिती उपस्थितांना दिली. सामाजिक भावना मनाशी बाळगून भावी पिढीमध्ये चांगल्या गोष्टीचा संदेश जावा, या हेतूने पुढाकार घेतला. योजनेसाठी कमी पडणाºया पैशांसाठी ५ लाख रुपये कर्ज काढावे लागले. मात्र, ग्रामस्थ विशेषत: येथील महिलांच्या चेहºयावरील समाधान त्याहून लाखमोलाचे आहे.- सुनील बुरुमकर, अध्यक्ष, पाणीपुरवठा समिती, परहूरपाडा