शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती गणेश सजावट स्पर्धेत मयूरेश प्रथम, महेश कुंभार हे या स्पर्धेत उत्कृष्ट मूर्तिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 01:14 IST

नेरळ ग्रामपंचायत आयोजित घरगुती गणेश सजावट स्पर्धेत नेरळ पाडा येथील मयूरेश विठ्ठल चंचे याने प्रथम क्र मांक पटकावला असून, गणेशमूर्ती स्पर्धेत प्रभंजन गायकवाड यांनी प्रथम क्र मांक प्राप्त केला आहे.

नेरळ : नेरळ ग्रामपंचायत आयोजित घरगुती गणेश सजावट स्पर्धेत नेरळ पाडा येथील मयूरेश विठ्ठल चंचे याने प्रथम क्र मांक पटकावला असून, गणेशमूर्ती स्पर्धेत प्रभंजन गायकवाड यांनी प्रथम क्र मांक प्राप्त केला आहे. नेरळ कुंभार आळी येथील महेश कुंभार हे या स्पर्धेत उत्कृष्ट मूर्तिकार ठरले आहेत.सांस्कृतिक कार्यक्र म व कला-क्रीडा प्रदर्शनात अग्रेसर असलेल्या नेरळ शहरात ग्रामपंचायतीच्या वतीने यंदा देखील घरगुती गणेशमूर्ती व सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत संपूर्ण नेरळ शहरातून उत्तम प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत शंभराहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते.घरगुती गणेश सजावटस्पर्धेत मयूरेश विठ्ठल चंचे याने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. छत्रपती शिवरायांचे कुलदैवत असलेल्या तुळजाभवानीचा महाराजांना झालेला साक्षात्कार व दुष्ट शक्तींचे निर्दालन करण्यासाठी दिलेली भवानी तलवार असा उत्कृष्ट देखावा मयूरेश यांच्या मखर सजावटीमध्ये साकारण्यात आला होता. गणेश सजावट स्पर्धेतील द्वितीय क्र मांक भास्कर निरगुडा, तृतीय क्र मांक लक्ष्मण पारधी, उत्तेजनार्थ ओंकार मनवे यांनी प्राप्त केला.उत्कृष्ट मूर्ती स्पर्धेत योगेश मारु ती मोरे याने द्वितीय क्र मांक ओंकार चंचे याने प्राप्त केला. कचरू बदेयांना उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. उत्कृष्ट मूर्तिकार स्पर्धेत योगेश मारु ती मोरे याने द्वितीय क्र मांक, मनोहर मोडक याने तृतीय क्र मांक प्राप्त केला.उत्कृष्ट मूर्तिकाराचे उत्तेजनार्थ पारितोषिक मिलिंद दहिवलीकर यांनी प्राप्त केले. यंदा थर्माकोलपेक्षा नैसर्गिक वस्तूंचा वापर करून मखर बनवण्याकडे कल होता. नेरळ टेप आळी येथील तरुण मूर्तिकार योगेश मोरे याने पर्यावरण संवर्धन या संकल्पनेवर आधारित मूर्ती साकारली होती, तर बल्लाळ जोशी यांनी स्वत: कागदाच्या लगद्यापासून इको फ्रेंडली गणेशमूर्ती साकारली होती.