शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

विहीर आटल्याने हंडाभर पाण्यासाठी तासभर पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:25 IST

आंबिवली गावाजवळ असलेल्या पेठ किल्ल्यावरील ग्रामस्थांना पाणीपुरवठा करणारी एकमेव विहीर कोरडी पडली आहे.

- विजय मांडे कर्जत : तालुक्यातील आंबिवली गावाजवळ असलेल्या पेठ किल्ल्यावरील ग्रामस्थांना पाणीपुरवठा करणारी एकमेव विहीर कोरडी पडली आहे. विहिरीतील पाण्याने तळ गाठल्याने शिवकालीन पेठ किल्ल्यावरील कुंडातून पाणी खाली आणण्याचे प्रयत्न करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बालाजी पुरी यांनी डिझेल पंप लावून पाणी खाली लोकवस्तीत आणण्याच्या सूचना दिल्या आहेत.कर्जतपासून अंबिवली गाव ४३ किलोमीटर अंतरावर आहे, तर पुढे दोन किमीवर डोंगरात चालत जाऊन पेठ गावात जाता येते. गावालगत मागे शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यातील रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीवर उभा असलेला किल्ला आहे. पेठ किल्ल्यावरील विहिरीवरच गावातील रहिवाशांची तहान भागते. मात्र, सध्या ती आटल्याने गावातील महिलांना जामरुख गावाकडे डोंगर उतरून पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. डोंगराखाली असलेल्या नदीमध्ये ग्रामस्थ डवरे खोदून पाणी भरतात आणि पुन्हा डोंगर चढून गावात पोहोचतात. म्हणजे हंडाभर पाण्यासाठी त्यांना तासभराची पायपीट करावी लागते.कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बालाजी पुरी यांनी २१ मे रोजी पेठ गावातील पाणीसमस्या जाणून घेतली. या ठिकाणी कोणतेही वाहन जात नसल्याने २ किलोमीटरची पायपीट करीत जामरुख ग्रामपंचायतचे प्रभारी प्रशासक सुनील आयरे यांच्यासह गावातील विहिरीचीही पाहणी केली. त्यानंतर ग्रामस्थांसोबत चर्चा करून पेठ किल्ल्यावर असलेल्या शिवकालीन पाण्याच्या कुंडांची पाहणी केली. तीनपैकी दोन कुंडांमध्ये पाणी आहे; पण ते खाली कसे आणायचे? असा प्रश्न निर्माण झाला. ग्रामस्थांची मागणी योग्य असल्याने तत्काळ ग्रामपंचायतीला आदेश देऊन किल्ल्यावरील पाणी खाली गावात आणण्यासाठी डिझेल पंप खरेदी करण्यास सूचित करण्यात आले.>पेठ गावातील पाणीटंचाईची दाहकता लक्षात आली असून, किल्ल्यावरील पाणी खाली आणण्याच्या सूचना दिल्या आहेत. पेठ गावात एक विहीर नव्याने खोदली जात असून त्यातून पाणीटंचाईचा प्रश्न काही प्रमाणात निकाली निघू शकेल.- बालाजी पुरी, गटविकास अधिकारी