शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आबर्ले ग्रामपंचायतीच्या सरपंचाचे सरकारी जागेत घर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 23:05 IST

पद रद्द करण्याची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज

माणगाव : तालुक्यातील आबर्ले ग्रुप ग्रामपंचायतीच्या विद्यमाने सरपंच रोहिणी रामदास उभारे यांनी संरक्षक वने या सरकारी जागेत अनधिकृत घर बांधले असून आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्या प्रकरणी आबर्ले ग्रामपंचायतीच्या माजी सरपंचा अनिता महाबळे यांनी विद्यमान सरपंच रोहिणी उभारे यांचे सरपंचपद रद्द करण्याचा तक्रार अर्ज दाखल केला होता. या चौकशीसाठी १३ डिसेंबर रोजी सरपंच गैरहजर राहिल्या.माजी सरपंच महाबळे यांनी विद्यमान सरपंचांनी बांधलेल्या अनधिकृत घराबाबतचा तक्रार अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे केला होता. याबाबतच्या तक्रार अर्जाची चौकशी करण्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी दिला असता, १२ डिसेंबर रोजी माणगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी महेंद्र गायकवाड व ग्रामसेवक संजय म्हात्रे आबर्ले ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहिले आसता, सरपंच रोहिणी उभारे उपस्थित राहिल्या नाहीत. यावर महाबळे यांनी अधिकाºयांकडून माहिती घेतली असता सरपंच वैयक्तिक कामानिमित्त अनुपस्थित राहिल्या असल्याचे सांगितले.या घराची घरपट्टी लावण्याकरिता अर्ज आला असता झालेल्या बैठकीच्या ठरावामध्ये हे घर अनधिकृत असल्याचे स्पष्ट लिहिले असून, त्यास ग्रामविकास व जलसंधारण विभाग शासन निर्णयानुसार ग्रामपंचायतीचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून घरपट्टी आकारावी असे लिहिले आहे. तरी या कामाची माझ्या तक्रार अर्जानुसार जिल्हाधिकाºयांनी चौकशी लावली आहे. त्याची गटविकास अधिकाºयांनी चौकशी करून सरपंच रोहिणी उभारे यांचे सरपंचपद रद्द करून मला न्याय द्यावा, अशी मागणी महाबळे यांनी केली आहे.सरपंच रोहिणी उभारे यांनी सरकारी जागेत घर बांधले, त्यानुसार महाराष्ट्रात ग्रामपंचायत अधिनियमन (१९६० चा मुंबई अधिनियमन ३) चे कलम १४ व १४(३) नुसार तक्रार अर्ज महाबळे यांनी केला असता, चौकशीसाठी विस्तार अधिकारी महेंद्र गायकवाड व मी, आबर्ले ग्रामपंचायत कार्यालयात गेलो होतो; परंतु सरपंच वैयक्तिक कामानिमित्त गैरहजर राहिल्याचे व तसा त्यांनी अर्ज आमच्याकडे दिल्याचे सांगितले.- संजय म्हात्रे, ग्रामसेवक,आबर्ले ग्रुप ग्रामपंचायतआम्ही दोन वेळा मोजणी केली त्यात एकदा अनधिकृत, एकदा अधिकृत निघते. आता पुन्हा एकदा मोजणी करेपर्यंत अनधिकृत आहे की अधिकृत, काहीच सांगता येणार नाही.- रोहिणी उभारे, सरपंच, ग्रामपंचायत कार्यालय, आबर्ले