शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

भरपाई लवकर न मिळाल्यास धरणे; पद्मदुर्ग व्यावसायिक संघटनेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 00:15 IST

चक्रीवादळामध्ये मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील स्टॉलचे नुकसान

आगरदांडा : निसर्ग चक्रीवादळामध्ये मुरुड समुद्रकिनारी असलेल्या सर्व स्टॉल्स जमीनदोस्त झाले. वादळानंतर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी नुकसानग्रस्त स्टॉल्सची पंचनाम केले. रविवारी त्या पंचनाम्याला ६७ दिवस झाले, तरी भरपाई मिळाली नाही. भरपाई न मिळाल्याने पद्मदुर्ग व्यावसायिक संघटनेने १५ आॅगस्टला धरणे आंदोलनाचा इशारा दिला असून, त्याचे रीतसर निवेदन मुरुड तहसीलदार गमन गावित यांना देण्यात आला आहे.मुरुड नगरपरिषदेचे ५० अधिकृत स्टॉल्स असून, स्टॉलमालक नगरपरिषदेला वार्षिक ८,००० रुपये भरतात, यामुळे दरवर्षी जवळजवळ चार लाखांचा महसूल मिळत आहे. नगरपरिषदेने स्टॉल्सधारकांची करारपत्रे व इतर कागदपत्रे तहसीलदार कार्यालयाकडे सुपुर्द केली आहेत; परंतु वादळ होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त दिवस झाले, तरी एकाही स्टॉलधारकांना भरपाई मिळालेली नाही. मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू झाल्यापासून स्टॉल बंद आहेत. त्यात या वादळाने स्टॉल्सचे नुकसान झाले आहे, अशा परिस्थितीत स्टॉलधारकांनी खायचे काय? हा प्रश्न उभा राहिला आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, असे असूनही मुरुड तहसील कार्यालयाकडून याबाबत कोणतीही हालचाल न केल्यामुळे, आम्ही सर्व येत्या १५ आॅगस्ट रोजी ध्वजारोहण करून तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला बसू, असा इशारा पद्मदुर्ग व्यावसायिक स्टॉलधारक संघटनेने दिला आहे. मुरुड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अमित पंडित यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.स्टॉलधारकांवर उपासमारीची वेळपद्मदुर्ग व्यावसायिक संघटना उपाध्यक्षा दिव्या सतविडकर यांनी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सरसकट व लवकारात लवकर नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते, परंतु सर्व स्टॉलधारकांना अद्याप भरपाईपासून वंचित ठेवण्यात आले आहे, चार महिने लॉकडाऊनमुळे स्टॉल्स बंद होते.स्टॉल्स उभा करण्याकरिता कोणी आपले दागिने विकले, तर कोणी कर्ज काढून स्टॉल्स उभे केले. शासनाने काही लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्याने, पुन्हा आम्ही शासनाच्या नियमांचे पालन करून स्टॉल्स चालू केले; परंतु निसर्गाच्या उद्रेकाने पुन्हा स्टॉलधारकांचे मोठे नुकसान झाले. शासनाकडून भरपाई मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती मिळाली नाही. त्यामुळे स्टॉलधारकांवर उपासमारीची पाळी आली आहे असे सांगितले.याबाबत मुरुड तहसीलदार गमन गावीत यांना विचारणा केली असता, त्यावेळी म्हणाले की, सदर टपरीधारक हे समुद्रकिनाºयापासून सीआरझेडच्या क्षेत्रामधील आहेत. हे निवेदन सीआरझेडच्या क्षेत्रामधील असल्यामुळे शासकीय मान्यता नसल्यामुळे, हे निवेदन जिल्हाधिकाºयांकडे पाठविण्यात आले आहे. जिल्हाधिकाºयांकडून आदेश आल्यास, त्यांना ताबडतोब नुकसान भरपाई देण्यात येईल.- गमन गावीत, तहसीलदार, मुरुड