शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शोभायात्रेतून उलगडला इतिहास

By admin | Updated: December 17, 2015 23:19 IST

नगरपरिषदेला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गुरुवारपासून शतकोत्तर सुवर्ण वर्षपूर्तीच्या कार्यक्रमास आरंभ होत आहे. यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन नगरपरिषदेने केले होते.

पेण : नगरपरिषदेला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गुरुवारपासून शतकोत्तर सुवर्ण वर्षपूर्तीच्या कार्यक्रमास आरंभ होत आहे. यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन नगरपरिषदेने केले होते. यावेळी १८ चित्ररथांतून पेण नगरीचा देदीप्यमान इतिहास शोभायात्रेतून उलगडला गेला. राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन या शोभायात्रेतून झाले.गुरुवारी सकाळी श्री गणेश पूजन व श्री सत्यनारायण महापूजेने शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. दुपारी ४,५०० ते ५,००० शालेय विद्यार्थी, शिक्षक, पेण नगरीच्या सर्व क्षेत्रातील आघाडीचे मान्यवर, पेणचे माजी मंत्री रवींद्र पाटील, पेण नगराध्यक्ष प्रीतम पाटील, गटनेते रवींद्र पाटील, पेण नगर प्रशासनाचे मुख्याधिकारी जीवन पाटील, विषय समित्यांचे सभापती नगरसेवक , नपा शिक्षण मंडळ, पेण सुमती देव प्रशाला, गुरुकुल प्रशाला, पेण प्रायव्हेट हायस्कूल, कारमेल इंग्रजी माध्यम प्रशाला, मदर तेरेसा इंग्रजी माध्यम प्रशाला, पेण नगर प्रशासनाच्या प्राथमिक प्रशाला, म.ना. नेने कन्या प्रशाला, कोएसो संस्थेच्या मराठी व इंग्रजी माध्यमाच्या प्रशाला या पेण नगरीच्या शिक्षण जगताच्या सर्व संस्था व प्रशाला, शिक्षक, विद्यार्थ्यांनी शोभायात्रेत सहभाग घेतला. यावेळी पेण नगरीच्या शैक्षणिक, आर्थिक, सेवाभावी, क्रांतिकारकांचे पुण्यस्मरण, आधुनिक जगताशी स्पर्धा करणारे, बारा बलुतेदारांचे व्यवसाय, संतांच्या दिंड्या व स्त्री सक्षमीकरण अशा तब्बल १८ विषयांना स्पर्श १८ चित्ररथातून सादर केला. विद्यार्थ्यांनी समाजाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे घोषवाक्य फलक, ढोल ताशांचा गजर व नव्या वाटचालीच्या पदपथाला स्पर्श करणारी पेण नगरीच्या शतकोत्तरी सुवर्णमहोत्सवाचा सळसळता उत्साह या शोभायात्रेतून पहावयास मिळाला. पेणकरांनी शोभायात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.