गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. दगड-मातीचा भराव, अवघड वळणे, आणि वाहनांचा अतिवेगामुळे महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने उपाययोजना सुरू केल्या आहेत. पळस्पे ते इंदापूर टप्प्यातील कामांमधील त्रुटींचा गांभीर्याने विचार करून पोलादपूर-महाड परिसरातील चांगल्या दर्जाचा मुरुम वापरण्यात येत आहे. याशिवाय रोलिंगचे कामही सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील महामार्गाचे रुंदीकरणही लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. आमचे विशेष प्रतिनिधी जयंत धुळप यांनी या कामाचा घेतलेला आढावा.
जुन्या गोवा महामार्गावरून वाहतूक सुरळीत ठेवण्याकरिता आणि अवघड वळण लक्षात आणून देण्यासाठी फलक लावण्यात आले आहेत.
ओव्हरटेकच्या नादात वाहन रस्त्यावरून उतरू नये म्हणून सावधानतेचा सूचनाफलक लावण्यात आला आहे.
गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर टप्प्यातील कामातील त्रुटी लक्षात घेऊन इंदापूर ते पोलादपूरच्या रुंदीकरणादरम्यान दर्जावर भर देण्यात येत आहे.
महामार्ग रुंदीकरणाच्या क्षेत्रात जेथे खडक (दगड) लागतो आहे, तो फोडून त्याचा वापर रुंदीकरणाच्या कामातच करण्यात येत असल्याने, अतिरिक्त दगडांची गरज भासत नाही आणि एकाअर्थी पर्यावरणाचा ºहास थांबविण्यास मदत होत आहे.