शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

रोहा शहरात हाय अ‍ॅलर्ट जारी

By admin | Updated: July 24, 2016 03:46 IST

दरोडा व घरफोडीच्या उद्देशाने मध्य प्रदेशातील एका टोळीने प्रवेश केल्याची माहिती गोपनीय विभागाकडून मिळाल्यावर शहरात हाय अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

रोहा : दरोडा व घरफोडीच्या उद्देशाने मध्य प्रदेशातील एका टोळीने प्रवेश केल्याची माहिती गोपनीय विभागाकडून मिळाल्यावर शहरात हाय अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. रोहा शहराचे मुख्य प्रवेशाचे मार्ग, सर्व बँका, एटीएम, ज्वेलर्सची दुकाने व अन्य मोक्याच्या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यासाठी पोलीस उपविभागीय अधिकारी अमोलकुमार झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ४०हून अधिक अधिकारी, कर्मचारी व आरसीपी जवानांचे पथक तैनात करण्यात आले आहे.शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी होत आहे. मात्र पोलीस प्रशासनाकडून याबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे. गुरुवारी रात्रीपासून शहरातील विविध भागांत आरसीपी जवान दाखल झाल्याने व्यापारीवर्गात भीतीचे वातावरण पसरले. तर रात्रपाळीला जाणाऱ्या कामगारांसहित सर्वांची कसून तपासणी सुरू झाल्याने घबराटीचे वातावरण होते. शुक्रवारपासून शहरातील बँका, बस आगार आदी ठिकाणच्या पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. शहरातील प्रत्येक शंभर ते सव्वाशे मीटर अंतरावर बंदूकधारी पोलीस व जवानांची नेमणूक करण्यात आली आहे.फॅन्सी नंबर प्लेट, काळ्या काचा असणाऱ्या वाहनांवर विशेष लक्ष दिले जात असून, धूमस्टाईल पद्धतीने काम करणारी झांबुआ टोळी दरोडा टाकून पळून जाते, या शक्यतेतून हा बंदोबस्त वाढविण्यात आल्याचे बोलले जात आहे. (वार्ताहर)