शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
3
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
4
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
5
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
6
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
7
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
8
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
9
९० खाजगी जेट, ३० वॉटर टॅक्सी... पण लग्नपत्रिकेवरुन ट्रोल! बेझोस-सांचेझ यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल!
10
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
11
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
12
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
13
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
14
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
15
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
16
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
17
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
18
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
19
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
20
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा

हेटवणे धरणाची पाइपलाइन फुटून लाखो लीटर पाणी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 23:38 IST

१०६ गावांचा पाणीपुरवठा काही काळ बंद : ७० फूट उंचीपर्यंत उडाले तुषार

उरण : सिडकोच्या हेटवणे धरणातून पाणीपुरवठा करणारी दीड मीटर व्यासाची पाइपलाइन गुरुवारी (१७) अचानक फुटली. त्यामुळे प्रचंड दाबाच्या पाइपलाइनमधून ७० फुटांपर्यंत पाण्याचे फवारे उडून लाखो लीटर पाणी वाया गेले असून यामध्ये एका घराचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.सिडकोच्या हेटवणे धरणातून उरण एमआयडीसी, द्रोणागिरी नोड, खारघर आदी विभागांतील १०६ गावांना पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठा करणारी दीड मीटर व्यासाची पाइपलाइन चिरनेरलगत असलेल्या आयपीसीएल ब्रीजजवळ गुरुवारी दुपारी ३.३० सुमारास अचानक फुटली. या दीड मीटर व्यासाच्या पाइपलाइनमधून ७ ते ८ किलो दाबाने पाणीपुरवठा केला जात असल्याने फुटलेल्या पाइपलाइनमधून सुमारे ७० ते ८० फुटी उंचीपर्यंत पाणी उडत होते. प्रचंड वेगाने उडणाऱ्या पाण्यामुळे शेजारीच असलेल्या एका घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.पाइपलाइन फुटल्याची माहिती मिळताच सिडकोच्या हेटवणे धरण प्रकल्पाचे उपअभियंता राजेश हटवार यांनी पथकासह तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाणीपुरवठा बंद केला. दीड मीटर व्यासाची पाइपलाइनवरील मेनहोल प्लेट तुटून उघडल्यानेच पाणी प्रचंड दाबाने बाहेर फेकले गेले असल्याची माहिती उपअभियंता राजेश हटवार यांनी दिली.यामध्ये एका घराचेही नुकसान झाले. आज होणार कमी दाबाने पाणीपुरवठा पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरू करण्यात आले आहे. पाच ते सात तासांत दुरुस्तीचे काम झाल्यावर पाणीपुरवठा सुरळीत सुरू करण्यात येणार आहे. तोपर्यंत उरण एमआयडीसी, द्रोणागिरी नोड, खारघर आदी विभागातील १०६ गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. तर शुक्रवारीही कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे उपअभियंता राजेश हटवार यांनी सांगितले.