शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियानात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
5
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
6
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
7
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
8
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
9
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
10
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
11
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
12
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
13
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
14
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
15
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
16
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
17
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
18
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
19
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
20
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई

हेटवणे-शहापाडा धरणे जोडणार

By admin | Updated: November 21, 2015 00:47 IST

शहापाडा धरण पेयजल योजनेतील वाशी, शिर्की, मसूद खारेपाटातील १० ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील टंचाईग्रस्त गावे व वाड्यांकरिता ३३.२७ कोटी खर्चाची हेटवणे-शहापाडा

पेण : शहापाडा धरण पेयजल योजनेतील वाशी, शिर्की, मसूद खारेपाटातील १० ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील टंचाईग्रस्त गावे व वाड्यांकरिता ३३.२७ कोटी खर्चाची हेटवणे-शहापाडा धरणांना जोडणाऱ्या राष्ट्रीय पेयजल योजनेला मुहूर्त सापडला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या या योजनेला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी ८ जून २०१५ रोजी दिलेल्या निर्देशानुसर शहापाडा पाणीपुरवठा योजनेच्या स्रोताचे बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने हेटवणे धरणाचे पाणी शहापाडा धरणाच्या जलशुद्धीकरण केंद्रात आणण्याचे सर्वेक्षण महाराष्ट्रजीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी पूर्ण केले आहे. गेले पंधरा वर्षे वाशी खारेपाटाचा गंभीर प्रश्न राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी भिजत पडला होता. फडणवीस सरकारने वर्षपूर्तीनिमित्त वचनपूर्ती कार्यक्रम थेट जनतेच्या दरबारी सरकारचा एक वर्षाच्या कामाचा लेखाजोखा मांडला जातोय. या अनुषंगानेच ‘पंधरा वर्षे आश्वासनाची एक वर्ष वचनपूर्तीचे’ या संकल्पनेत पेण खारेपाटाची पाणीटंचाईवर कायमस्वरुपी उपाययोजना म्हणून हेटवणे धरणाचे पाणी थेट शहापाडा धरणात आणण्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेचा आधार घेतला आहे.शहापाडा पाणीपुरवठा योजनेच्या स्रोताचे बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने हेटवणे धरणाचे पाणी शहापाडा धरणाच्या जलशुद्धीकरण केंद्रात आणण्याचे सर्वेक्षण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी पूर्ण केले आहे. या सर्वेक्षण कामासाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ४ लाख ३३ हजारांचा निधी उपलब्ध झाल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने याचे अंदाजपत्रक तयार केले आहे. त्यांची उपांगनिहाय अंदाजित किंमत ३३ कोटी २७ लाख रुपये इतकी आहे. केंद्रीय मंत्री अनंत गीते, रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता आदींसह भाजपा, शिवसेना कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी निधी मंजूर करण्याची मागणी केली होती.सध्या वाशी व मसद शिर्की विभागातील जनतेला पाणीटंचाईचा जबरदस्त फटका बसत असून खारेपाटाच्या या दोन्ही बाजंूकडून जनतेच्या तक्रारी व त्याबाबतची निवेदने प्रांतअधिकारी निधी चौधरी यांना दिवसाआड देण्यात येत आहेत. याबाबत शुक्रवारी वाशी विभागातील ६ ग्रामपंचायत सरपंचांनी महासंघ स्थापन करुन राजकारणविरहित एकत्र येवून पाणीटंचाई समस्या सोडविण्यासाठी निवेदन प्रांत अधिकारी निधी चौधरी यांना दिले आहे. दूषित पाणी व पाणीटंचाई याबाबतची निवेदने वारंवार आमच्याकडे येत असून याबाबतची सर्व माहिती रायगड जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे. जिल्हाधिकारी शीतल तेली- उगले याबाबत लवकरच संबंधित यंत्रणा व लोकप्रतिनिधी, सरपंच यांची बैठक घेवून अंमलबजावणीचे निर्देश देतील.- निधी चौधरी, प्रांत तथा महसूल अधिकारी.