शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर अवजड वाहनांना बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 00:16 IST

१८ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून २२ आगॅस्टपर्यंतचे आदेश

- निखिल म्हात्रे अलिबाग : बाप्पाचे आगमन आता काही दिवसांवर येऊ ठेपले आहे. येत्या २२ आॅगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई येथून हजारो गणेशभक्त त्यांच्या वाहनांनी मोठ्या प्रमाणावर कोकणात आपल्या गावी दाखल होणार आहेत. त्यांचा प्रवास सुखकर आणि सुरिक्षत व्हावा, याकरिता मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश १४ आॅगस्ट रोजी जारी के ले.कोकणात गणेशोत्सवासाठी हजारोंच्या संख्येने चाकरमानी दाखल होतात. त्यामुळे या कालावधीत महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढते. मुंबई-गोवा-राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरून गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा, याकरिता महाराष्ट्र शासनाकडून केलेल्या आदेशाप्रमाणे रायगड पोलिसांकडून अवजड वाहन बंदी आदेश जारी केले आहेत.या आदेशानुसार, १८ आॅगस्ट रोजी मध्यरात्री बारा वाजल्यापासून ते २२ आॅगस्ट रोजी सायंकाळी ८ वाजेपर्यंत १६ टन किंवा त्यापेक्षा जास्त वजनाच्या वाहतुकीस पूर्ण वेळ बंदी राहणार आहे. तर गौरी-गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी २८ आॅगस्ट रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते २९ आॅगस्ट रोजी सकाळी वाजेपर्यंत १६ टन किंवा त्यापेक्षा जास्त वजनाच्या वाहतूक पूर्णवेळ बंद राहील. १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ८ वाजल्यापासून ते २ सप्टेंबर रोजी रात्री बारा वाजेपर्यंत १६ टन किंवा त्यापेक्षा जास्त वजनाची वाहतूक दिवसा बंद राहील, तर रात्री सुरू राहणार आहे. १८ आॅगस्ट रोजी मध्यरात्री बारा वाजल्यापासून ते २ सप्टेंबर रोजी रात्री बारा वाजेपर्यंत वाळू, रेती व तत्सम गौणखनिज वाहतुकीस पूर्ण वेळ बंदी करण्यात आली आहे.