शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या पोषक आहाराकडे आरोग्य समिती देणार लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 01:46 IST

शाळा, महाविद्यालयाचे उपहारगृह अन् घरच्या डब्यासाठीही मार्गदर्शक तत्त्वे

मुंबई : प्रत्येक शाळा, महाविद्यालयात आरोग्य समिती स्थापन करून उपहारगृहात अथवा घरून आणल्या जाणाऱ्या डब्यात पोषक आहार कसा असावा याबाबत अन्न व औषध प्रशासनाने नियमावली तयार केली असून, त्याची जुलै ते डिसेंबर २०१९ पर्यंत अंमलबजावणी होणार आहे़ त्यासाठी शाळा, महाविद्यालयात जागरूकता निर्माण करून जंक फूडला हद्दपार करीत डब्याचा ८० टक्के भाग हरीत पदार्थांचा असावा, अशी सूचना केली आहे़

अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त डॉ़ पल्लवी दराडे यांनी संपूर्ण वर्षभराचा पोषण आहार कार्यक्रम शाळा व महाविद्यालयांना कळविला आहे़ राज्य शासनाने अन्न व औषध प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना मान्य केल्या आहेत़ त्यानुसार प्रत्येक शाळेत आरोग्य समिती असेल ज्यामध्ये शिक्षक, विद्यार्थी व पालक असतील़ ज्याद्वारे शाळा, महाविद्यालयातील उपहारगृहामध्ये दिले जाणारे पदार्थ, भोजन आरोग्यदायी होईल याची काळजी घेतली जाईल़ जंक फूडचा प्रचार आणि प्रसार होणार नाही याची काळजी शाळांनी घ्यायची आहे़ तसेच जिथे मुले घरून डबा आणतात त्या शाळांनी पालकांना विश्वासात घेऊन पोषक आहाराचा समावेश केला पाहिजे़आरोग्य सदृढ रहावे यासाठी हिरव्या पालेभाज्य व कडधान्यावर भर देणे आवश्यक आहे़पॅकिंग पदार्थांमुळे मुले घरचे पदार्थ खात नाहीत़़़४जंक फूड हे आपल्या सगळ्यांच्या जीवनशैलीचा भाग होत आहे़ त्याचा मुलांच्या आरोग्यावर मोठा दुष्परिणाम होत आहे़ त्यामुळे घरून आणला जाणारा डबा व कँटिनमधील पदार्थांमध्ये मोठे बदल सुचविण्यात आले आहेत़४कँटिनच्या भोजनात जंकफूड नाहीसे करण्याचे आदेश दिले आहेत़ पोषक आहार नसल्यामुळे मुले एचएफएसएस अर्थात हाय फॅट शुगर अँड सॉल्ट म्हणजेच ज्यामध्ये मेद, मीठ आणि साखरेचे प्रमाण जास्त आहे, असे पदार्थ खातात़४आकर्षक जाहिरातींमुळे कमी किमतीतील पॅकिंगमधील पदार्थांची सवय लागते़ ज्यामुळे घरी बनविलेले पदार्थ मुले खात नाहीत़ त्याचे दुष्परिणाम म्हणून आवश्यक कार्बोदके व प्रथिने मुलांना मिळत नाहीत़४दरम्यान, शाळा, महाविद्यालयांना आपल्या संस्थेत दिल्या जाणाºया अन्न पदार्थांच्या मेनुची माहिती आॅगस्ट ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत संबंधित अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना द्यावी लागेल़ तसेच सहाय्यक आयुक्त व आरोग्य समन्वयक शाळांना भेट देवून आढावा घेतील़आॅक्टोबर, नोव्हेंबरमध्ये कार्यशाळा४शाळा, महाविद्यालयातील मुख्याध्यापक, प्राचार्य, आरोग्य समिती, विद्यार्थी, पालक यांना पोषक आहाराचे महत्व सांगण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन अन्न व प्रशासन विभाग करणार आहे़ त्याचा अहवाल डिसेंबरमध्ये पाठवून शाळा, महाविद्यालयात दिल्या जाणाºया अन्न पदार्थांच्या मेनूमध्ये बदल केला जाणार आहे़महापालिकेच्या शाळांमध्ये बचत गटाच्या माध्यमातून पोषक आहार वितरित केला जातो. या आहारातील पदार्थ महासभेच्या मान्यतेने ठरविण्यात आले आहेत. शासनानाच्या सूचनांनुसार खाजगी शाळा आणि महाविद्यालयात जंक फूडचा प्रचार आणि प्रसार होणार नाही याबाबत सूचना तसेच जनजागृती करण्यातयेणार आहे.- नितीन काळे, उपायुक्त, नवी मुंबई शिक्षण विभाग 

टॅग्स :raigad-pcरायगडRaigadरायगड