शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य मेळाव्यात ४५०० रुग्णांची तपासणी; आदिवासी बांधवांनी घेतला मोठा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 00:28 IST

रायगड जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने कर्जतमध्ये आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय आरोग्य मेळाव्याचा समारोप ११ आॅक्टोबर रोजी झाला. कर्जत तालुक्यात झालेल्या आरोग्य मेळाव्याचा आदिवासी बांधवांनी मोठा लाभ घेतला.

नेरळ : रायगड जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने कर्जतमध्ये आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय आरोग्य मेळाव्याचा समारोप ११ आॅक्टोबर रोजी झाला. कर्जत तालुक्यात झालेल्या आरोग्य मेळाव्याचा आदिवासी बांधवांनी मोठा लाभ घेतला. तीन दिवसांत ४५०० रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्याप्रसंगी समारोपीय कार्यक्रमात रायगड जिल्ह्याचे शिक्षण, क्रीडा आणि आरोग्य सभापती नरेश पाटील यांनी या मेळाव्याला सर्वतोपरी सहकार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि सर्व आरोग्य कर्मचारी यांचे कौतुक करत, ‘तुम्ही यापुढेही आपल्या कामात असेच सातत्य ठेवून जनतेची सेवा करत राहा’, असे सांगितले.या वेळी कर्जत तालुक्यातील २ हजार ६०० हून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली.रायगड जिल्ह्यातील पनवेल-२६, म्हसळा-७, माणगाव-११४३, अलिबाग-५०, पेण-४०, सुधागड- १०० आणि खालापूर-६०९ अशा रुग्णांनी तपासणी केली, तर कर्जत तालुक्यातील २६०० हून अधिक रुग्णांनी आपली उपस्थिती लावून तपासणी करून घेतली.कर्जत तालुक्यातील कुपोषण लक्षात घेऊन आज आरोग्य मेळाव्याच्या तिसºया दिवशी ‘सॅम’ आणि ‘मॅम’ श्रेणीतील २०० बालकांची तपासणी एमजीएमच्या डॉक्टरांनी केली. त्याच वेळी जिल्ह्यातील १५० हून अधिक दिव्यांग रुग्णांचीही तपासणी करण्यात आली. याप्रसंगी बोलताना जिल्हा परिषदेचे आरोग्य समिती सभापती नरेश पाटील यांनी असे आरोग्य मेळावे भविष्यात जिल्ह्यातील सर्व तालुक्यात आयोजित करण्याचे आश्वासन दिले. कर्जत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सी. के. मोरे यांनी आभार मानले.या जिल्हा आरोग्य मेळाव्यात आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील इतर तालुक्यातील रुग्णांची संख्या मोठी होती. या मेळाव्यात तपासलेल्या १५० रुग्णांवर चांगल्या उपचारांची गरज असून ते उपचार एमजीएम हॉस्पिटल येथे दिले जाणार आहेत.- डॉ. सचिन पाटील,जिल्हा आरोग्य अधिकारी, रायगड जिल्हा

टॅग्स :Raigadरायगड