शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

नगराध्यक्ष पद्धतीवर लवकरच शिक्कामोर्तब

By admin | Updated: September 26, 2016 02:19 IST

राज्य निवडणूक आयोगाने नुकतेच एक पत्र जारी करून आगामी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक या राज्य मंत्रिमंडळाने ३० आॅगस्टला जो निर्णय घेतला आहे

नांदगाव/मुरुड : राज्य निवडणूक आयोगाने नुकतेच एक पत्र जारी करून आगामी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक या राज्य मंत्रिमंडळाने ३० आॅगस्टला जो निर्णय घेतला आहे त्याप्रमाणेच निवडणूक पद्धत अवलंबण्याचे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी व कोकण आयुक्त यांना बजावण्यात आले आहेत. त्यामुळे थेट नगराध्यक्ष पद्धत रद्द होणार व पूर्वीप्रमाणेच नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवडला जाईल या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.याबाबत अनेक अफवा व्हॉट्स अ‍ॅपवर पसरवण्यात येऊन त्यावर काही बातम्या सुद्धा वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. परंतु आता राज्य निवडणूक आयोगानेच २३ सप्टेंबर २०१६ रोजी पत्र जारी करून जनतेमधून थेट नगराध्यक्ष व बहुसदस्य प्रभाग पद्धती प्रमाणे नगरसेवक निवडले जाणार असे स्पष्ट नमूद केले आहे.त्याप्रमाणे जिल्हाधिकारी यांना अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे.आता फक्त थेट नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर होणे बाकी आहे.ते जाहीर होताच प्रचाराला वेग प्राप्त होणार आहे. प्रत्येक पक्षाचे आरक्षण काय पडणार याकडे विशेष लक्ष आहे.; परंतु आरक्षण जाहीर न झाल्याने अस्वस्थता वाढत आहे. मुरु ड नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाने आपापला उमेदवार तयार ठेवला आहे. जर महिला आरक्षण पडले तर योग्य उमेदवाराचा शोध घेणे फार कठीण भाग होऊन बसणार आहे. परंतु पुरु ष आरक्षणाला खूप मोठी स्पर्धा दिसून येत आहे. आता थेट नगराध्यक्ष निवडणूक पद्धत राहणार असल्याने योग्य उमेदवाराचा काही पक्ष शोध सुद्धा घेताना दिसत आहेत. लवकरच थेट नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर व्हावे अशी प्रत्येक राजकीय पक्षाची इच्छा आहे.