शहरं
Join us  
Trending Stories
1
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
2
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
3
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
4
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
5
Asia Cup Final : सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
6
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
7
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
8
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
9
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
10
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
11
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
12
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
13
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
14
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
15
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
16
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
17
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
18
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
19
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
20
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी

बहिष्काराच्या प्रथेने काढले डोके वर

By admin | Updated: October 8, 2015 00:05 IST

व्यापक प्रमाणात राबविलेल्या मोहिमेमुळे सामाजिक बहिष्कारांच्या प्रथा बंद झाल्याचे सांगत पाठ थोपटून घेणाऱ्या रायगड जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस प्रशासनाचे पितळ उघडे पडले आहे.

- आविष्कार देसाई,  अलिबागव्यापक प्रमाणात राबविलेल्या मोहिमेमुळे सामाजिक बहिष्कारांच्या प्रथा बंद झाल्याचे सांगत पाठ थोपटून घेणाऱ्या रायगड जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस प्रशासनाचे पितळ उघडे पडले आहे. परजातीमध्ये विवाह केल्याने श्रीवर्धन तालुक्यात निगडी येथील गावपंचायतीने ५० हजार रुपयांचा दंड ठोठावल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. याप्रकरणी ३१ जणांविरोधात रायगडच्या पोलीस अधीक्षकांमार्फत श्रीवर्धन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सहा महिन्यांपूर्वी जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या व्यापक मोहिमेने वाळीत प्रथा बंद झाल्याचा दावा प्रशासन करीत आहे. मात्र या घटनेने खरे चित्र समोर आले असल्याचे बोलले जाते.दिलीप बाळाराम जावळेकर आणि अमोल सदानंद जावळेकर हे दोघेही सुतार समाजातील असून ते श्रीवर्धन तालुक्यातील निगडी गावात राहतात. दिलीप यांचा मुलगा राजू जावळेकर याने मराठा समाजातील मुली (रा. कोळे, ता.म्हसळा) बरोबर रजिस्टर मॅरेज केले. त्यांना एक मुलगी आहे. त्याचप्रमाणे अमोल जावळेकर यांनी कुणबी समाजातील मुली (रा. मुहुलवाडी, ता. देवगड, जि.रत्नागिरी) बरोबर रीतसर लग्न केले असून त्यांना एक मुलगा आहे.गावकीने याचा जाब जावळेकर कुटुंबाला विचारला. त्यांच्या विरोधाला न जुमानल्यामुळे परजातीमध्ये लग्न केल्याने गावकीचे पित्त खवळले. गावकीने प्रथम त्यांची गावकीसाठी घेण्यात येणारी वर्गणी बंद केली. पूजेसाठी लागणारी गावकीच्या मालकीची भांडीही दिली नाहीत आणि पूजेलाही आले नसल्याचे दिलीप आणि अमोल जावळेकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. काकीच्या भरणी श्राध्दाच्या विधीतून गावकीने हाकलून लावल्याचेही तक्रार अर्जात नमूद आहे. राजमार्गावर कुंपण घालून येण्या-जाण्याची वहिवाटही बंद करण्यात आली होती. त्यानंतर कायदेशीर मार्गाने तो मार्ग मोकळा करुन घेतल्याचे दिलीप जावळेकरांचे म्हणणे आहे. लग्न कार्यासाठी भांडी न देणे, लग्नाला न येणे अशा प्रकारे समाजातून एक प्रकारे बहिष्कृत करीत मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. सामाजिक बहिष्काराच्या प्रथेमुळे गावकीचे पंच भारतीय संविधानाला विरोध करीत समांतर न्याय व्यवस्था निर्माण करीत असून ती सर्वच समाजातील नागरिकांना आणि पर्यायाने लोकशाहीला घातक आहे. सामाजिक बहिष्काराची कीड वेळीच रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस प्रशासनाने पावले टाकणे गरजेचे आहे. सामाजिक बहिष्कारचे बिल लवकरच पारित झाले, तर अशा घटनांना निश्चितच आळा बसण्यास मदत होणार आहे.पोलीस अधीक्षकांचे जनसंपर्क अधिकारी पोलीस निरीक्षक अरविंद पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते कामानिमित्त मुंबईमध्ये होते.मोलमजुरी करणारे कुटुंब अडचणीत१जावळेकर कुटुंबाला मदत करणारे सुनिता जावळेकर, सुजाता पानवलकर, रजनी कातळकर, नम्रता पालवणकर आणि शालिनी जोगळेकर यांचीही वर्गणी घेण्याचे बंद केले असून त्यांनाही वाळीत टाकल्याचा दावा जावळेकर कुटुंबाने तक्रारीत केला आहे. ५० हजार रुपयांचा दंड भरा आणि समाजात परत या, असे गावकीकडून धमकावले जात आहे. ५० हजार रुपये दंड भरता येत नसल्याने १५ हजार रुपयांच्या दंडाची मागणी करीत असल्याचेही जावळेकर म्हणाले.३सामाजिक बहिष्काराच्या प्रथेमुळे गावकीचे पंच भारतीय संविधानाला विरोध करीत समांतर न्याय व्यवस्था निर्माण करीत असून ती सर्वच समाजातील नागरिकांना आणि पर्यायाने लोकशाहीला घातक आहे. सामाजिक बहिष्काराची कीड वेळीच रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस प्रशासनाने पावले टाकणे गरजेचे आहे. सामाजिक बहिष्कारचे बिल लवकरच पारित झाले, तर अशा घटनांना निश्चितच आळा बसण्यास मदत होणार आहे.दिलीप बाळाराम जावळेकर आणि अमोल सदानंद जावळेकर हे दोघेही सुतार समाजातील असून ते निगडी गावात राहतात. दिलीप यांचा मुलगा राजू जावळेकर याने मराठा समाजातील मुली बरोबर रजिस्टर मॅरेज केले आहे.