शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

शाळा सुरू करण्यासाठी कष्टकऱ्यांचा मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2021 00:16 IST

डहाणू प्रकल्प कार्यालयासमोर ठिय्या : आदिवासी भागातील मुलांचे होते नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कडहाणू : कोविडमुळे राज्यातील शिक्षण क्षेत्राचेही मोठे नुकसान झाले आहे. मात्र आता हळूहळू सर्व व्यवहार पूर्वपदावर येत असून पालघर जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रातील शिक्षण व्यवस्था अजूनही सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे डहाणू प्रकल्पाअंतर्गत आश्रमशाळा तसेच जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा सुरू कराव्यात, या मागणीसाठी कष्टकरी संघटनेने डहाणू प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढला.आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शाळा सुरू करण्याबाबत संघटनेचे अध्यक्ष ब्रायन लोबो यांनी निवेदन सादर केले. या मोर्चात शेकडो विद्यार्थी, पालक व संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले.

डहाणू प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात १७ वसतिगृहे व ३५ आश्रमशाळा आहेत. तसेच तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ४७१ प्राथमिक व ४८ माध्यमिक शाळा आहेत. लॉकडाऊनमध्ये शहरातील विद्यार्थ्यांना काही प्रमाणात ऑनलाइन शिक्षण मिळाले. परंतु आदिवासी भागात ऑनलाइन व्यवस्था पूर्णतः अपयशी ठरली. डहाणू व पालघरमधील डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले. आता लॉकडाऊनचे नियम शिथिल होत असताना आदिवासी क्षेत्रातील शाळा अजूनही बंद असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षण व्यवस्थेत टिकण्यासाठी शाळा नियमित सुरू करणे हा पर्याय असल्याचे कष्टकरी संघटनेचे म्हणणे आहे.प्रकल्पात समाविष्ट आश्रमशाळेत विद्यार्थ्यांची आरटीपीसीआर चाचणी घेऊन त्यांना निवासी राहण्याची व्यवस्था करावी, चालू शैक्षणिक वर्ष मे महिन्याच्या अखेरपर्यंत वाढवून १० दिवसांनंतर जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करावे, इ. मागण्यांचे निवेदन कष्टकरी नेते ब्रायन लोबो, मधुबेन धोडी, सिराज बलसारा यांच्या शिष्टमंडळाने सहायक प्रकल्प अधिकारी शकुंतला मते, उमेश काशीद व पं.स.चे गटविकास अधिकारी यांना देण्यात आले.

यावेळी आम्हाला स्मार्टफोन द्या, कुठे आहे जंगलात नेटवर्क? ऑनलाइन शिक्षण बंद करा, आमची शाळा सुरू करा, अशा घोषणा देत शेकडो विद्यार्थ्यांनी प्रकल्प आवारात ठिय्या आंदोलन केले.

टॅग्स :Raigadरायगड