शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

दीड तासांच्या प्रयत्नांती तरुणाला वाचविण्यात यश

By admin | Updated: July 16, 2017 02:53 IST

उमरोली गावातील नागरिकांना पावसाळ्यात गावात जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. नदी पार करूनच घरी पोहोचावे लागते. जीवावर उदार होऊन येथील ग्रामस्थांना

- लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : उमरोली गावातील नागरिकांना पावसाळ्यात गावात जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. नदी पार करूनच घरी पोहोचावे लागते. जीवावर उदार होऊन येथील ग्रामस्थांना नदीवर असलेल्या छोट्या पुलावरून जावे लागते. याच पुलावरून शनिवारी दुपारी एक तरुण जात असताना पाय घसरल्याने पाण्यात पडला. धुवाधार पावसामुळे त्याला बाहेर येणे शक्य झाले नाही. अखेर अग्निशमन दल व तालुका पोलिसांनी ग्रामस्थांच्या अथक परिश्रमाने त्याचा जीव वाचवला.जवळपास हजारो लोकवस्ती असलेले उमरोली गाव गाढी नदीच्या किनारी वसलेले आहे. गावातील नागरिकांना नदीवरील छोट्याशा फरशी पुलावरून जावे लागते. पावसाळ्यात फरशीवरून जाताना नागरिकांची तारांबळ उडते. या ठिकाणी पाय घसरून पडल्याने कित्येक जण जखमी झाले आहेत. तर काहींना जीव गमवावा लागला आहे. शनिवारी दुपारी ३च्या सुमारास झारखंड येथे राहणारा २२ वर्षीय युवक अजय सिंग हा हरीग्राम येथील इमारतीवरील काम आटोपून उमरोली गावात जात होता. नदीला आलेला पूर पाहून आजूबाजूच्या नागरिकांनी त्याला नदीतून न जाण्याचा सल्ला दिला. मात्र, तरीही त्याने फरशीवरून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. नदीतून जात असताना त्याचा पाय घसरला व तो पाण्यात पडला व वाहून जाऊ लागला. अग्निशमक दलाचे अनिल जाधव, सहायक पोलीस निरीक्षक शालिग्राम, शैलेश ठाकूर यांच्या मदतीने अग्निशमक दलाच्या जवानांनी दोरीच्या साहाय्याने मोठ्या प्रयत्नाने दोरीच्या साहाय्याने एक ते दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर अजय सिंग याचा जीव वाचविला. या वेळी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.जवळपास १०० फूट पुढे असलेल्या कातळावर सिंग अडकला. आजूबाजूच्या नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी ताबडतोब अग्निशमक दलाला कळविले व सिडको व महापालिकेची अग्निशमक दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली.