शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोंडी धनगरवाड्यातील रस्त्यासाठी गुरुजी सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 23:10 IST

ग्रामस्थांसह राबविली श्रमदान मोहीम

- विनोद भोईरपाली : सुधागड तालुक्यातील कोंडी धनगरवाड्यापर्यंत जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. ठाकरे घराण्याचे कुलदैवत असलेली कोंडजाई देवीचे मंदिर ही या ठिकाणीच आहे. मात्र शासनाच्या दुर्लक्षामुळे मागील कित्येक वर्षांपासून या रस्त्याची साधी डागडुजी झालेली नाही. अखेर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक राजेंद्र खैरे तसेच स्वदेस फाउंडेशनचे प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर दीपक मेनन यांनी ग्रामस्थांना एकजूट करून श्रमदानातून हा रस्ता सुकर केला आहे. ही मोहीम तीन दिवसांत पूर्ण झाली.शिक्षक राजेंद्र खैरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व ग्रामस्थ हाती फावडे, कुदळ, घमेले आदी साहित्य घेऊन रस्ता दुरुस्तीसाठी एकत्र आले. मोहिमेत महिला, लहानगे, वृद्ध आदींचा पुढाकार होता. रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेली खडी व दगड व्यवस्थित पसरण्यात आले. मोठाले दगड हटविण्यात आले. आजूबाजूची झाडेझुडपे तोडण्यात आली. त्यानंतर पसरलेल्या दगडांवर बुरम व मातीचा भराव त्यावर टाकण्यात आला आणि रस्ता सुस्थितीत करण्यात आला.सुधागड तालुक्यातील कोंडी धनगरवाडा म्हणजे उत्पन्नाचे कोणतेही साधन नसलेल्या आणि हातावर पोट असलेल्या गरिबांचे गाव. गावापर्यंत एसटीची सुविधा नाही. येथून जवळपास चार-साडेचार किमी अंतरावर नागशेत गावाला एसटी येते. मात्र नागशेत ते कोंडी धनगरवाड्यापर्यंतचा रस्ता अतिशय खराब झाला आहे. मागील अनेक वर्षांपासून नवीन रस्ता सोडाच, पण जुन्या रस्त्याची साधी डागडुजीही झालेली नाही. त्यामुळे येथे मोठाले खड्डे पडले आहेत. दगड व माती वर आल्याने येथून चालणेही दिव्य आहे. येथील वृद्ध, महिला, रुग्ण व विद्यार्थ्यांना या खडतर रस्त्यावरून ८ किलोमीटरची पायपीट करावी लागते. विशेष म्हणजे हा रस्ता पूर्णपणे जंगलातून जातो. राजकीय पुढारी, नेते तसेच शासन फक्त आश्वासनांशिवाय काही देत नसल्याचे ग्रामस्थ विशाल ढेबे यांनी सांगितले. तर मंगेश ढेबे यांनी शिक्षक राजेंद्र खैरे व स्वदेसचे दीपक मेमन यांनी पुढाकार घेऊन गावकऱ्यांना श्रमदानासाठी एकत्र केले. या श्रमदान मोहिमेत शिक्षक राजेंद्र खैरे, ग्रामपंचायत सदस्य बाळू ढेबे, स्वदेस फाउंडेशनचे प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर दीपक मेनन, ग्रामस्थ प्रकाश ढेबे, रामचंद्र बावधाने, दगडू कोकरे, मंगेश ढेबे, सुनील हिलम, भाऊ बावधाने, दगडू गोरे, व लक्ष्मण ढेबे, नामदेव ढेबे व पांडुरंग ढेबे आदी सहभागी झाले होते.श्रमदानाचे महत्त्व खूप मोठे आहे. कोंडी धनगरवाडीला सोयीसुविधांचा अभाव आहे. त्यामुळे पुढारी व नेत्यांची अधिक वाट न पाहता गावकऱ्यांना सोबत घेऊन येथील समस्या सोडविण्याचा प्रयत्न करत आहे. ग्रामस्थांचे यासाठी खूप मोठे योगदान आहे.- राजेंद्र खैरे, शिक्षक, राजीप कोंडी, धनगरवाडा

शिक्षक राजेंद्र खैरे यांनी पुढाकार घेऊन लोकांमध्ये श्रमदान व गावातील समस्या सोडविण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. ते खऱ्या अर्थाने आदर्श शिक्षक आहेत.- बाळू ढेबे, ग्रामपंचायत सदस्य