शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

गुढीपाडवा आणि श्रीराम जन्मोत्सवसुद्धा शासकीय मनाई आदेशात

By admin | Updated: March 26, 2017 04:57 IST

प्रथम नगरपरिषदांच्या निवडणुका त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका यांच्या निमित्ताने जिल्हाभर मनाई

अलिबाग : प्रथम नगरपरिषदांच्या निवडणुका त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका यांच्या निमित्ताने जिल्हाभर मनाई आदेश लागू करण्यात आले होते. आता, २८ मार्च रोजीच्या हिंदू नववर्ष दिनी अर्थात गुढीपाडवा आणि ४ एप्रिल रोजीच्या श्रीराम जन्मोत्सव दिनासदेखील रायगड जिल्ह्यात शासकीय मनाई आदेश लागू राहाणार आहे. रायगडचे अप्पर जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये रायगड जिल्हा पोलिसांनी लागू केलेला हा मनाई आदेश गुरुवार, २३ मार्च रोजी सकाळी ८ वाजल्यापासून लागू करण्यात आल्याबाबतची माहिती शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे शनिवार २५ मार्च रोजी प्रसिद्धी माध्यमांना देण्यात आली आहे.रायगड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखली जावी, यासाठी रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राच्या हद्दीत २३ मार्च २०१७ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते ५ एप्रिल २०१७ रात्रौ १२ वाजेपर्यंत कोणत्याही जमावास किंवा मिरवणुकीस या अधिसूचनेद्वारे मनाई करण्यात आली आहे. परिणामी, नववर्ष स्वागताच्या जिल्ह्यात गुढीपाडव्याच्या दिवशी निघणाऱ्या शोभायात्रा आयोजकांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे.यंदाचा ४ एप्रिल रोजीचा श्री राम जन्मोत्सवदेखील जिल्ह्यात मनाई आदेशातच साजरा करावा लागणार असल्याने, या दिवशी गावोगाव निघणाऱ्या श्री रामांच्या पालखी मिरवणुका होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याकरितादेखील परवानग्या घ्याव्या लागणार आहेत. (विशेष प्रतिनिधी)उत्सव, सभा, मिरवणुकांना परवानगीबाबतचे अधिकार संबंधित तहसीलदारांना  २८ मार्च रोजी असलेला गुढीपाडवा, तसेच राज्यलेखा व कोषागार कर्मचारी संघटना यांचे सामूहिक रजा आंदोलन, रसायनी पोलीस ठाणे हद्दीत आॅल इंडिया इंडस्ट्रीयल अ‍ॅण्ड जनरल वर्कर्स सेक्रेटरी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या कामगारांचा संप या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखली जावी यासाठी अप्पर जिल्हादंडाधिकारी रायगड-अलिबाग यांनी मुंबई पोलीस अधिनियमच्या अधिकाराचा वापर करु न २३ मार्च ते ५ एप्रिलदरम्यान जिल्ह्यात हे मनाई आदेश जारी केले असल्याचे शासकीय प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, या कालावधीत होणारे उत्सव, सभा, मिरवणुका इत्यादी कार्यक्र मास परवानगी देण्याबाबतचे अधिकार संबंधित तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांना देण्यात आले आहेत.