शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 03:45 IST

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५८व्या वर्धापनदिनाचा रायगड जिल्हास्तरीय मुख्य शासकीय समारंभ मंगळवारी सकाळी अलिबाग येथील जिल्हा पोलीस परेड मैदानावर उत्साहात पार पडला.

अलिबाग : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५८व्या वर्धापनदिनाचा रायगड जिल्हास्तरीय मुख्य शासकीय समारंभ मंगळवारी सकाळी अलिबाग येथील जिल्हा पोलीस परेड मैदानावर उत्साहात पार पडला. जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.सोहळ्याला जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, अप्पर जिल्हाधिकारी भरत शितोळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, अप्पर पोलीस अधीक्षक संजय पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, उपविभागीय अधिकारी सर्जेराव सोनवणे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, उपजिल्हाधिकारी भूसंपादन विश्वनाथ वेटकोळी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शेषराव बढे, तसेच स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक आदी मान्यवर उपस्थित होते.पालकमंत्री यांनी ध्वजारोहणानंतर परेडचे निरीक्षण केले. या वेळी पोलीस दल व अन्य दलांनी मानवंदना दिली. परेड कमांडंट भास्कर महादेव शेंडे यांच्या नेतृत्वात झालेल्या शानदार संचलनात पोलीस दल, होमगार्ड, वज्र पथक, अग्निशमन दल, नागरी संरक्षण दल, श्वान पथक, बॉम्ब शोध व नाश पथकांनी सहभाग नोंदवला. पोलीस बॅण्डच्या सुरावर तालबद्ध संचलनाने उपस्थितांची मने जिंकली. सोहळ्यास स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, माजी सैनिक, सामाजिक-राजकीय कार्यकर्ते, शासकीय अधिकारी-कर्मचारी, नागरिक आदी उपस्थित होते. या वेळी सूत्रसंचालन किरण करंदीकर यांनी केले.