शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

गायमुखला पर्यटनाचा दर्जा देणार, पालकमंत्र्यांचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 01:56 IST

पालकमंत्र्यांचे आश्वासन : तळा येथे जनता दरबार

तळा : पंचायत समितीच्या नानासाहेब धर्माधिकारी सभागृह जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या पुढे नागरिकांनी बेरोजगारी, पाणी प्रश्न, रस्त्याची झालेली दुरवस्था अशा विविध समस्यांचा पाढा वाचला. तालुक्यातील गायमुखला पर्यटनाचा दर्जा दिला जाईल तसेच ऐतिहासिक कुडालेणी, तळगड यांचादेखील विकास केला जाणार असल्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.

सुरुवातीलाच नागरिकांनी महावितरण विभागाच्या मनमानी कारभाराची तक्रार पालकमंत्र्यांकडे केली. सूचना न देता वीजपुरवठा बंद करणे, मीटरची रीडिंग न घेता वीजबिल देणे, बिल्डरांना दहा दिवसांत मीटर दिला जातो तर गोरगरीब जनतेला महिना उलटूनही मीटर दिले जात नाहीत, तक्रारीसाठी कार्यालयात गेले असता अधिकारी उपस्थित नसतात अशा अनेक तक्रारींचा पाढाच वाचला. तालुक्यातील रोजगाराचा प्रश्न, बसस्थानकाची झालेली दुरवस्था, पर्यटनवाढीची उपाययोजना, खेडेगावातील रस्त्यांचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न अशा अनेक समस्या शेतकरी बांधवांनी मांडल्या. त्याला उत्तर देताना पालकमंत्री आदिती तटकरे यांनी तालुक्यात कंपन्या येऊन रोजगार उपलब्ध केला जाणार आहे, बसस्थानकाची दुरुस्ती करून योग्य सुविधा पुरविल्या जातील, पाण्याची टंचाई असलेल्या गावात पाण्याचे नवीन पाइप टाकण्यासाठी अंदाजपत्रक तयार करून लवकरच कामे सुरू केली जातील. अपूर्ण असलेल्या रस्त्यांचे काम लवकरच पूर्ण करण्यात येतील.या जनता दरबारात तहसीलदार ए.एम. कनशेट्टी, गटविकास अधिकारी विजय यादव, पंचायत समिती सभापती देवकी लासे, नगराध्यक्षा रेश्मा मुंढे, पोलीस निरीक्षक सुरेश गेंगजे यांसह सर्व शासकीय अधिकारी, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :Raigadरायगड