शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गौरीपाडा तलावाची संरक्षक भिंत कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 05:16 IST

जीवितहानी नाही : बांधकामाबाबत प्रश्नचिन्ह, ठेकेदारासह अधिकाऱ्याची चौकशीची मागणी

चिकणघर : कल्याण पश्चिमेकडील गौरीपाडा येथील कर्नाळा तलावाची संरक्षक भिंत झाडांसकट शुक्र वारी मध्यरात्री १२.१५ च्या दरम्यान अचानक कोसळली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. २०१४ मध्ये या भिंतीचे बांधकाम झाले होते. अवघ्या चार वर्षांतच भिंत कोसळल्याने तिच्या बांधकामाविषयी प्रश्न उपस्थित झाला आहे.

कर्नाळा तलावाची ही भिंत १०५ फूट लांब आणि पाच फूट रुंद होती. तलाव परिसरात सकाळ-सायंकाळी नागरिक फेरफटका मारण्यासाठी येतात. कठड्यावर बसण्यासाठी त्यांची गर्दी होते. परंतु, भिंत कोसळण्याची घटना रात्री घडल्याने मोठी जीवितहानी टळली. पदपथाला एका बाजूला आणखी तडे गेल्याने भिंतीचा आणखी काही भाग कोसळण्याच्या स्थितीत आहे. सध्या येथील कर्नाळादेवी मंदिरात पहाटेपासून भजन सुरू आहे. तेथे सकाळी दर्शनास येणाºया भाविकांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी तत्काळ दोर बांधून बघ्यांना भिंतीजवळ जाण्यास अटकाव केला. भिंतीची त्वरित पुनर्बांधणी न केल्यास तेथे अपघाताच होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली.दरम्यान, पाण्यात दगड रचून बांधलेल्या जोत्यावर भिंत बांधलेली आहे. भिंतीच्या कडेलाच वाहनांचे बेकायदा पार्किंग होते. तसेच खालून पाण्याचा दाब आणि वरून वाहनांचा भार, यामुळे भिंत कोसळली, अशी माहिती गौरीपाडा येथील रहिवासी वसंतअप्पा म्हात्रे यांनी दिली. यामुळे सदर भिंत ज्या ठेकेदाराने बांधली त्याच्यासह देखरेख ठेवणाºया अधिकाºयाची चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.एका नागरिकाने खबर दिल्याने आम्ही त्वरित घटनास्थळी पोहोचलो. भिंतीसह दोन झाडेही पाण्यात पडली. ती जेसीबीद्वारे खेचून वाचवण्याचा प्रयत्न केला जाईल. नागरिकांच्या सुरक्षेसाठी दोºया बांधल्या आहेत. केडीएमसीच्या अधिकाºयांना त्याची कल्पना दिली आहे.- दिलीप गुंड, अधिकारी, अग्निशमन दल, केडीएमसीघटनास्थळी पाहणी केली आहे. निधी उपलब्ध होताच भिंतीची पुनर्बांधणी शक्य होईल. तोपर्यंत नागरिकांच्या सुरक्षेसाठी बॅरिकेड्स उभारण्याचे काम सुरू केले आहे.- शशांक केदार,उपअभियंता, बांधकाम विभाग, केडीएमसी

टॅग्स :Raigadरायगड