शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात बेदरकार चालकांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 00:47 IST

जिल्ह्यात बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या घटना वाढतच असल्याचे दिसून येत आहे.

- जयंत धुळप अलिबाग : विनापरवाना वाहन चालविणे धोकादायक आहे. दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करावा, बेदरकार वाहन चालवू नये, आपल्या पाल्याकडे परवाना नसताना त्याला दुचाकी घेऊन देऊ नये आदी नियमांबाबत वाहतूक पोलिसांकडून जनजागृती करण्यात येत आहे. मात्र, तरीही जिल्ह्यात बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या घटना वाढतच असल्याचे दिसून येत आहे.जानेवारी व फेब्रुवारी या महिन्यात रायगड जिल्हा वाहतूक पोलिसांनी बेफिकिरीने वाहन चालविणे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे या कारणास्तव विविध प्रकारचे तब्बल १२ हजार ७४६ गुन्हे दाखल केले आहेत. आणि या चालकांकडून एकूण ३० लाख ९९ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्याची कारवाई केल्याची माहिती रायगड जिल्हा वाहतूक पोलीस शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली आहे.महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल झाल्यास त्याचे परिणाम त्याच्या भवितव्यावर होतात. उच्चशिक्षणाकरिता परदेशी जायचे असले तर पासपोर्ट आवश्यक असतो. पासपोर्टकरिता पोलीस चौकशी अहवाल लागतो. या चौकशी अहवालात विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल असल्याची नोंद आल्यास त्यास पासपोर्ट नाकारला जातो. याबाबत वाहतूक पोलीस बेदरकार चालक तसेच शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सातत्याने समजावून सांगत असतात. मात्र, त्याकडे विद्यार्थी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले. पालकांनीही मुलांना परवान्याशिवाय वाहने चालविण्यास देऊ नये. अनेकदा त्यांच्याकडून वाहतून नियमांची पायमल्ली होत असल्याचे सांगितले.पालकांवर दंडात्मक कारवाईविनापरवाना, विनाहेल्मेट, ट्रिपलसीट, वेगात दुचाकी चालविताना दोनपेक्षा अधिक वेळेस तोच विद्यार्थी वा युवक वाहतूक पोलिसांना सापडल्यास त्याच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्या पाल्याच्या गुन्ह्याबाबतची कल्पना देण्याचाही प्रयोग संवेदनशीलतेने वाहतूक पोलिसांनी जिल्ह्यात केला. त्यात काही पालकांनी आपल्या पाल्याची चूक मान्य करून पुन्हा असा गुन्हा त्यांच्याकडून घडणार नाही अशी हमी दिली, तर काही पालक पाल्याचे समर्थन करीत असल्यानेही अपघातांत वाढ होत आहे.पालकांवर दंडात्मक कारवाईदुचाकी वाहनांच्या जिल्ह्यात होणाऱ्या अपघातांमध्ये जखमी आणि मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये अल्पवयीन व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. असे अपघात होऊ नयेत, याकरिता विशेष मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. अनेकदा सांगूनही बेदरकार, विनापरवाना दुचाकी चालविणाºया १६५ युवकांच्या पालकांवर गुन्हे दाखल केले असता, न्यायालयाने पालकांवर दंडात्मक कारवाई केली असल्याचे वराडे यांनी सांगितले.2 महिन्यांत १२ हजार ७४६ गुन्हे165 विद्यार्थ्यांच्या पालकांवर दंडात्मक कारवाईरायगड जिल्हा वाहतूक पोलिसांकडून वाहन अपघात थांबविण्याचे विविध उपक्रम

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस