शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यासाठी अधिकाऱ्यांना घातला घेराव

By admin | Updated: November 21, 2015 00:44 IST

रोहे रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी या मागणीसाठी अलिबाग काँग्रेसने शुक्रवारी अलिबाग कार्यकारी अभियंत्याला घेराव घातला. काम सुरू होत नाही, तोपर्यंत अधिकाऱ्यांना

अलिबाग : रोहे रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी या मागणीसाठी अलिबाग काँग्रेसने शुक्रवारी अलिबाग कार्यकारी अभियंत्याला घेराव घातला. काम सुरू होत नाही, तोपर्यंत अधिकाऱ्यांना खुर्चीतून बाहेर पडू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतल्याने अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली.येत्या आठ दिवसांत तालुक्यातील रस्त्यांची दुरुस्ती पूर्ण करण्याचे आदेश अलिबाग कार्यकारी अभियंता विलास कांबळे यांना कोकण भुवन येथील अधीक्षक अभियंता मोहिते यांनी दिले. कायम सत्तेमध्ये राहिलेल्या काँग्रेसने आता विरोधात राहून जनतेच्या प्रश्नावर आवाज उठविण्यास सुरुवात केली असल्याचे दिसून येते. अलिबाग- रोहे रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. ४८ तासांमध्ये या रस्त्याची दुरुस्ती करावी, अन्यथा घेराव घालण्यात येईल, असा इशारा अलिबाग काँग्रेसने दोन दिवसांपूर्वी दिला होता. मात्र कामाला सुरुवात झाली नव्हती. रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी अलिबागच्या बांधकाम विभागाला ४८ तासांची दिलेली मुदत शुक्रवारी संपल्याने सार्वजनिक बांधकाम कार्यालयाला घेराव घालण्यात आल्याचे अलिबाग तालुकाध्यक्ष अनंत गोंधळी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. सकाळीच कार्यालयावर धडक दिल्याने बांधकाम खात्यातील अधिकारी आणि कर्मचारी चांगलेच भांबावून गेले. अचानक मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते आल्याने पोलिसांनाही पाचारण करावे लागले. पोलीस आले तरी कार्यकर्ते काहीही ऐकण्याच्या तयारीत नव्हते. आधी रस्त्यांच्या कामांना सुरुवात करा, त्यानंतरच कार्यकारी अभियंता विलास कांबळे आणि उपअभियंता दिलीप विडेकर यांना घातलेला घेराव काढण्यात येईल, असा पवित्रा घेतल्याने वातावरण अजूनच चिघळले. अधीक्षक अभियंता मोहिते यांनी येत्या आठ दिवसात कामे पूर्ण करा असे आदेश कांबळे यांना दिले. येत्या आठ दिवसांमध्ये कामे पूर्ण न केल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा अनंत गोंधळी यांनी दिला. (प्रतिनिधी)